शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे नवं ट्वीट, शेअर केला ‘हा’ फोटो

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवे ट्विट केले असून यात त्यांनी शिवकालीन होन फोटो शेअर केले आहेत. तसेच संभाजीराजेंनी आणखी एक ट्वीट  केले असून त्यात म्हटले आहे की, स्वराज्याचे सार्वभौमत्व अन् संपन्नतेचे प्रतीक असणारा होन हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे. राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन होनच्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक (Shivrajyabhishek Din) सोहळा साजरा होणार आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या

शिवराय मनामनांत – शिवराज्यभिषेक दिन घराघरांत
दरम्यान 2 दिवसांपूर्वी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून खासदार संभाजीराजेंनी शिवप्रेमींशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी शिवप्रेमींनी 6 जूनला रायगडावर गर्दी करू नये घरीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा, अशी विनंती केली. 2007 पासून आपण सगळ्यांनीच शिवराज्यभिषेक सोहळ्याला उत्सवाचे स्वरुप दिले आहे. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय उत्सव व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे. पण गेल्यावर्षी कोरोनामुळे उत्सव झाला नाही, पण आपण परंपरा पाळली. गेल्यावर्षी लोकांना मी घरीच राहण्याची विनंती केली होती. लोकांनीही ऐकलं त्यांचे मी आभार मानतो. यंदाची परिस्थितीही तशीच आहे. त्यामुळे शिवराय मनामनांत – शिवराज्यभिषेक दिन घराघरांत या भावनेतून घरीच हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजेंनी शिवप्रेमींना केले आहे.

COVID-19 in India : कोरोनाचा वेग आणखी मंदावला; 24 तासात 1.20 लाख केस, 3380 रूग्णांचा मृत्यू

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाम
मी सर्वांना घरीच शिवजयंती साजरी करा सांगत असलो तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाम असल्याचे खासदार संभाजीराजे म्हणाले.
मराठा समाजाला गृहित धरू नका, आमची भूमिका ठाम आणि कायम आहे.
रायगडावरून लाखो बांधवांचा आवाज मांडणारच असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

25 वर्षांच्या हलीमाने एकाचवेळी दिला होता 9 मुलांना जन्म; एक महिन्यानंतर ‘ही’ आहे स्थिती