Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्ग तब्बल 5 दिवस बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणता?

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Samruddhi Mahamarg | जालना ते छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावरुन तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या मार्गावर दोन टप्प्यात पाच दिवसांसाठी महामार्ग बंद राहणार आहे. समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपी संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते 3.30 पर्यंत बंद राहणार आहे. तर दुसऱ्या ट्प्प्यात 25 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते 3 यावेळेत बंद राहणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळवले आहे. (Samruddhi Mahamarg)

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रानसमशिन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम केले जाणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 10 ते 12 (मंगळवार, बुधवार, गुरुवार) तर दुसरा टप्पा 25 व 26 ऑक्टोबर (बुधवार व गुरुवार) असेल. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक 10 ते 12 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 3.30 वाजेपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात 25 ते 26 ऑक्टोबरला दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत बंद करण्यात येणार आहे. इतर कालावधीत या भागातील समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असेल. (Samruddhi Mahamarg)

पर्यायी मार्ग कोणता?

तब्बल पाच दिवस समृद्धी महामार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
यापार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे.
नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
सावंगी इंटरचेंज-जालना माहामार्गावरुन विरुद्ध दिशेने निधोना-जालना समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन
नागपूरकडे वळवण्यात येणार आहे. तसेच इंटरचेंज-निधोना एमआयडीसी जालना महामार्गावरुन छत्रपती संभाजीनगर
केंब्रिज शाळा उजवीकडे वळून सावंगी बायपास सावंगी इंटरचेंजहून शिर्डीच्या दिशेने प्रवासी जाऊ शकतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | राष्ट्रपती राजवटीवरुन फडणवीसांचा गौप्यस्फोट; शरद पवार म्हणाले – ‘भाजपकडे बहुमत होतं, तर…’

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिंदे गटाने ठाकरेंना डिवचलं, मातोश्री बाहेर बॅनरबाजी