Samvidhan Samman Daud In Pune | संविधानाच्या सन्मानासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह धावले पुणेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Samvidhan Samman Daud In Pune | आज २६ नोव्हेंबर अर्थात संविधान दिन. यानिम्मित्त आयोजित “संविधान सन्मान दौड 2023” मध्ये तब्बल 31 देशातील विद्यार्थ्यासह एकूण सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेचे आयोजन डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे ,सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशनयांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. स्पर्धेच्या सुरवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे  सामूहिक वाचन करण्यात आले. (Samvidhan Samman Daud In Pune)

या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वज दाखवून  उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, मुख्य संयोजक परशुराम वाडेकर ,प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे, पोलीस आयुक्त रितेश कुमार , राहुल डंबाळे यासह विविध मान्यवर उपस्थित होते . (Samvidhan Samman Daud In Pune)

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या संसदेने संविधान स्वीकारलं याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त दरवर्षी संविधान सन्मान दौड आयोजित केली जाते. सगळीकडेच विविध कार्यक्रमातून हा दिवस साजरा केला जातो. मात्र, संविधान दीन साजरा करण्यापेक्षा संविधाना बद्दल जागरूकता निर्माण करणे जास्त आवश्यक आहे. आज परशुराम वाडेकर यांनी ही संविधान सन्मान दौड आयोजित केली आहे. तेव्हा दौडकडे केवळ लक्ष न जाता. संविधानाकडे आपले लक्ष गेले पाहिजे. डॉ. आंबेडकरांचे समस्त भारतीयांवर खूप मोठे उपकार आहेत.

भारताची लोकशाही सुद्रूड करण्याचे काम त्यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असं संविधान लिहिलं आहे जे हजारो वर्ष बदलावेच लागणार नाही. काय झाल्यास काय करावे, असं व्यवस्तीत विवेचन यामध्ये आहे. नव्याने तयार झालेल्या अनेक देशांनी या संविधानाकडे पाहून आपले संविधान तयार केले.  तसेच  आपल्याकडे सुट्ट्यांचा आग्रह जास्त होतो. मात्र त्या ऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रमाणे पाव खाऊन काम करायचे, त्या प्रमाणे आपण या दिवशी काम करण्याचा संकल्प करावा असे पाटील यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व सहभागी नागरिकांचे मी अभिनंदन करतो, सदृढ आणि सक्षम समाजासाठी खेळ महत्वाचे आहेत. 

दरम्यान,  या स्पर्धेत धावू शकल्या नाही अशा महिलांनी  ‘वॉक फॉर संविधान’ रॅली काढली होती. . या वॉक ची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली, पुढे जाऊन  विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि विद्यापीठातीलच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीचे सचिव दीपक म्हस्के आणि मानसी बोकिल यांनी केले. 

संविधान सन्मान दौड स्पर्धेचा निकाल

10 किमी पुरूष

अंकुश लक्ष्मण हाके 
प्रवीण बबन कांबळे 
दयाराम रमेश गायकवाड 

5 किमी पुरूष

हितेश संतोष शिंदे 
देविदास धनराज बारे
धीरज रामप्रकश चंदेल

3 किमी पुरूष

मनीष संजय मेश्राम
अशोक गणपत उंडे
सुभाष ज्ञानेश्वर कानोजिया 

10 किमी महिला

राणी सदाशिव मुचंडी
अर्चना आढाव
ऋतुजा शंकर माळवदकर

5 किमी  महिला

प्रियांका लालस ओकास
गायत्री गणेश चौधरी
सुहानी खोब्रागडे 

3 किमी  महिला

माधुरी चंद्रकांत वानवारे
नेत्रा गणेश मच्छा 
श्रद्धा संदीप निकम

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी

10 किमी  महिला

सलाम – इथोपिया
मासाऊ – बांगलादेश
इव्हा – पोलंड

5 किमी  महिला

सुचेता – थायलंड
मकारा – कंबोडिया
ओलव्हिया – पोलंड

3 किमी महिला

ऊर्मिला – बांगलादेश
नफोसिया – उसबेगिस्तान 
दृष्टी – बांगलादेश

10 किमी  पुरूष

महम्मद – झांबिया
रेहमान – अफगाणिस्तान
मामाझिया – अफगाणिस्तान

5 किमी  पुरूष

हारून – अफगाणिस्तान
मोहित – नेपाळ 
इगोर – मोझांबिक

3 किमी  पुरूष

अली –  चार्ड 
इस्माईल – सोमालिया
दीपो – बांगलादेश

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत तरुणीची 10 लाखांची फसवणूक