Pune Crime News | पुणे : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत तरुणीची 10 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शेअर मार्केटचे (Stock Market) ऑनलाइन क्लास (Online Class) घेऊन स्टोरेक अकाऊंट ओपन करण्यास भाग पाडून शेअरमध्ये गुंतवणूक (Investment) करण्यास सांगून तरुणीची 10 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार सप्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान तरुणीच्या राहत्या घरी ऑनलाईन घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत दत्तवाडी येथील 29 वर्षीय तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 86380XXXXX, 74778XXXXX मोबाईल धारक, विविध युपीआय आयडी धारक तसेच विविध बँक खातेधारक यांच्यावर आयपीसी 420, 34 सह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाईल धारकाने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून राधिका शर्मा बोलत असल्याचे सांगून कार्तिकेयन गणेशन यांची मदतनीस असल्याचे सांगितले. त्यानंतर वारंवार व्हॉट्सॲप मेसज करुन फिर्यादी यांना चार महिन्यांच्या शेअर मार्केटच्या प्लॅबाबत माहिती दिली. यानंतर तरुणीला तिची माहिती पाठवण्यास सांगून शेअर मार्केटची माहिती कार्तिकेयन गणेशन हे देतील असे सांगून व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करुन घेतले.

व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करुन घेतल्यानंतर फिर्य़ादी यांचे ऑनलाईन क्लास घेतले. त्यानंतर डॅडी इन्टर
प्रायझेसवर स्टोरेक अकाउंट ओपन करण्यासाठी व्हॉट्सॲपवर स्कॅनर पाठवून अकाऊंट ओपन करुन घेतले.
शेअर खरेदी करुन गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून
फिर्यादी यांना 9 लाख 90 हजार रुपये विविध बँक खात्यात भरण्यास भाग पाडले.
त्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता तसेच घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (PI Vijay Khomene) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक, सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे : पगाराचे पैसे मागितल्याने तरुणाला दगडाने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : ‘तु मोठा भाई झाला का?’ म्हणत तरुणाचे दात पाडले, चार जणांवर FIR