सनातन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

दहशतवाद विरोधी पथकाने सनातन चा साधक वैभव राऊत याच्या नाला सोपारा यैथील घरावर छापा टाकून तेथून तसेच जवळच असलेल्या दुकानातून ८ बॉम्ब आणि बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, सनातनच्या वकिलांनी हा आरोप फेटाळला आहे.

[amazon_link asins=’B07FBMMW5P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db45d977-9c4e-11e8-a738-73db61c8ae1e’]

नालासोपाऱ्यात काल रात्री दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. दहशतवादीविरोधी पथकाच्या छाप्यात ८ देशी बॉम्बसह स्फोटके बनवण्याचे साहित्य सापडले आहे. नालासोपाºयातील भांडार आळी भागात राहणाऱ्या वैभव राऊत याला अटक करण्यात आली आहे. बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संशयितावर पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाची टीम पाळत ठेवून होती. त्याच्याविषयी खात्री पटल्यानंतर काल रात्री पोलिसांनी घरावर छापा टाकला.

दरम्यान, सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. सनातनला बदनाम करण्याचा गृहमंत्र्यांचा डाव असल्याचे सांगत सनातन संस्थेवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याचबरोबर वैभवची बाजुही त्यांनी मांडली. वैभवच्या घरी स्फोटके सापडणे शक्य नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद असून वैभवला शक्य ती सर्व मदत करु, असेही त्यांनी सांगितले.