Sandeep Aur Pinky Faraar Trailer : ‘अर्जुन-परिणिती’च्या सिनेमाचा ट्रेलर, ट्विस्ट’ आणि ‘कन्फ्युजन’नं भरपूर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि परिणिती चोपडा स्टारर संदीप और पिंकी फरार हा सिनेमा याच महिन्यात 20 तारेखला म्हणजेच 20 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे. दिबाकर बॅनर्जी दिग्जर्शित या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं होतं. यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये ?

संदीप और पिंकी फरार या सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातालीच कॉर्पोरेट कर्मचारी संदीप कौर(परिणिती) पळत असते. पळत पळत ती हरियाणाचा पोलीस अधिकारी पिंकी दहिया(अर्जुन कपूर) याच्या कारमध्ये पोहोचते. ती दिल्लीच्या बाहेर जाण्याचं सांगते. यानंतर दोघं एका वृद्ध कपलच्या (नीना गुप्ता, रघुबीर यादव) घरी रहायला लागतात.

https://www.instagram.com/p/B9Qku8WpvyP/?utm_source=ig_embed

पिंकीला हे जाणून घ्यायचं होतं की, संदीपनं असं काय केलं आहे की, ती पळत आहे. पिंकीचा बॉस (जयदीप अहलावत) त्याला संदीप कौरला मारण्याची ऑर्डर देतो. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, पिंकी संदीपला मारतो की तिला साथ देतो. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 20 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे. दिबाकर बॅनर्जीनंच हा सिनेमा डायरेक्ट असून प्रोड्युसही केला आहे.

अर्जुन कपूरनं आपल्या करिअरची सुरुवात परिणिती चोपडासोबत इशकजादे सिनेमातून केली होती. हा सिनेमा खूप पसंत गेला होता. यात त्यांची ऑनस्क्रीन जोडी हिट झाली. यानंतर ते नमस्ते लंडन मध्ये दिसले. आता पुन्हा एकदा ते संदीप और पिंकी फरार सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत.