Sandeep Khardekar On Ravindra Dhangekar | पराभवाच्या भीतीपोटी रविंद्र धंगेकर आरोप करीत आहे- भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sandeep Khardekar On Ravindra Dhangekar | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोथरुड (Kothrud) येथील छत्रपती शिवाजी महाराज ते डेक्कन (Deccan) येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant), विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेघा कुलकर्णी (Medha Kulkarni), आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir MLA) यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाजपने काढलेली पदयात्रा शहराच्या मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. पदयात्रेत कार्य़कर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड (Traffic Jam In Pune) त्रास सहन करावा लागला होता. तर दुसऱ्या बाजूला गुंड प्रवृतत्तीची व्यक्ती देखील पदयात्रेत सहभागी झाले होते, अशी माहिती समोर येत आहे. यावरुन महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला होता. धंगेकर यांच्या टीकेला भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संदीप खर्डेकर म्हणाले, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात
आलेल्या पदयात्रेत 50 हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. ही सर्व गर्दी रविंद्र धंगेकर यांनी निश्चित पाहिली असेल
ही विजयाची नांदी असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. पराभवाच्या भीतीपोटी रविंद्र धंगेकर हे आरोप करत आहेत.
तसेच या पदयात्रेत एकही गुंड किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती सहभागी झाला नव्हता.
जर तशी लोक असतील तर त्यांना दाखवून द्यावे, आम्ही चौकशी करु, मात्र, त्या ठिकाणी अशा प्रवृत्तीची व्यक्ती नव्हती,
अशी भूमिका खर्डेकर यांनी मांडली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला, ”त्यांच्याबद्दल मनापासून वाईट वाटते, एखाद्याची एवढी वाईट अवस्था होऊ नये”

MG Road Pune Accident | पुण्यातील एम.जी. रोडवर अपघात, अलिशान गाडीने अनेक वाहनांना उडवलं (Video)