Sangeeta Bijlani | संगीता बिजलानीच्या डिप नेक लाईनने वेधले लक्ष; वयाच्या 63 व्या वर्षी देखील दिसते तितकीच सुंदर, सलमानची काढली आठवण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) हिने मनोरंजन विश्वामध्ये एक काळ गाजवला आहे. 1980 साली मिस इंडियाचा (1980 Miss India) तुरा आपल्या नावे करणारी संगीता हिच्या आजही बी टाऊनमध्ये चर्चा चालू असतात. मिस इंडिया झाल्यानंतर तिने ‘कातिल’ या चित्रपटामधून (Qatil Movie) बॉलीवुडमध्ये जबरदस्त (Sangeeta Bijlani Bollywood Debut) एन्ट्री केली. यामधील संगीता व आदित्य पांचाली (Aditya Pancholi) यांची जोडी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली होती. त्यानंतर संगीता बिजलानी हिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. संगीता ही नुकतीच ‘लिवा मिस दिवा 2023’ (LIVA Miss Diva 2023) या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या डिप नेक गाऊनने सर्वांना अवाक केले. वयाच्या 63 व्या वर्षी देखील संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) हिचे सौंदर्य पाहून चाहत्यांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे.

बॉलीवुडमधील एक काळ गाजवणारी अभिनेत्री संगीता बिजलानी हिचा आजही मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्यावर व अदांवर चाहते फिदा आहेत. तिने नुकतीच ‘लिवा मिस दिवा 2023’ या इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. तिच्या डिप नेक गाऊनने सर्वांचे लक्ष वेधले होते. अभिनेत्री संगीता बिजलानी हिने डिझायनर लॉंग गाऊन स्टाईल केला होता. डिप नेक असलेल्या या गाऊनला सुंदर वर्क केलेले होते. ग्लोईंग मेकअपसह तिने केस मोकळे सोडले होते. एवढ्या वयामध्ये तिचे हे सौंदर्य पाहून उपस्थित लोक देखील आश्चर्यचकित झाले. संगीता बिजलानी हिचे लिवा मिस दिवा 2023 इव्हेंटमधील फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले असून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काहींनी सलमान खानची (Salman Khan) आठवण काढली आहे.

अभिनेत्री संगीता बिजलानीच्या या सिजलिंग लूकवर (Sangeeta Bijlani Sizzling Look) सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “या वयामध्ये देखील हे सौंदर्य पाहून कोणी म्हणेल का ती 63 वर्षांची आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “63 इज जस्ट नंबर’ अशा कमेंट करण्यात आल्या आहेत. काहींनी तर तिने प्लास्टिक सर्जरी व बोटॉक्स केले असल्याचे बोलले आहे. अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) हिच्या व्हायरल व्हिडिओमुळे नेटकऱ्यांना सलमान खानची देखील आठवण आली आहे. सलमान व संगीता यांचे अफेअर (Sangeeta Bijlani And Salman Affair) खूप गाजले होते. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “सलमानने मोठा चान्स मिस केला.” तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “संगीताच सलमानसाठी परफेक्ट होती.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Patil Recruitment | मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती

ACB Trap News | 1 लाख 30 हजार रुपये लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यासह (BDO) तिघेजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात