Sangli Crime News | अंगावर पडणाऱ्या ट्रॅक्टरपासून मुलांना वाचण्याच्या नादात आईचा दुर्दैवी मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Sangli Crime News | सांगलीमधील शिराळा या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आपल्या मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका आईला आपला जीव गमवावा लागला आहे. शिराळा येथील तडवळे या ठिकाणी घरासमोर उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरुन घसरुन रस्त्यावर खेळत असलेल्या दोन मुलांच्या अंगावर जात होता. हि गोष्ट आईच्या लक्षात येताच तिने तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र यादरम्यान धावताना आईचा पाय घसरला आणि ट्रक्टरला जोडलेला नांगराचा फाळ तिच्या डोक्यात घुसला. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. (Sangli Crime News)

 

मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात आईचा मृत्यू
संचिता संपत पाटील असे या मृत आईचे नाव आहे. मुलांना वाचवताना या आईने जीव गमावल्याने दोन मुलं पोरकी झाली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तडवळे या ठिकाणी पाटील कुटुंब राहतं. संपत पाटील यांनी त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर नेहमीप्रमाणे घरासमोर रस्त्याच्या कडेला उभा केला होता. हि घटना घडली तेव्हा संचिता या अंगणातील गोठा स्वच्छ करत होत्या आणि त्यांची दोन्ही मुलं कृषांत आणि दुर्वा हि दोघे रस्त्यावर खेळत होती. (Sangli Crime News)

यादरम्यान अचानक रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रॅक्टर सरकला आणि तो रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांच्या दिशेने जाऊ लागला. हि बाब लक्षात येताच संचिता यांनी आरडाओरड केली आणि थेट त्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी धावताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या ट्रॅक्टरच्या मागे जोडलेल्या नांगराच्या फाळावर जाऊन पडल्या. त्यामुळे नांगराचा फाळा त्यांच्या डोक्यात घुसला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारदरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

Web Title :- Sangli Crime News | tractor accident mother dies while saving children from tractor in shirala

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

Devendra Fadanvis | नाशिक पदवीधर निवडणूकीत देवेंद्र फडणवीस यांनीच केला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम?

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर