सांगली : मलनि:स्सारण केंद्रात पडून दोन कर्मचा-यांचा मृत्यू

सांगली :पोलीसनामा ऑनलाईन

महापालिकेच्या भारतभीम जोतीरामदादा पाटील कुस्ती आखाडा येथील मलनि:स्सारण केंद्रात पडून गुदमरून दोन कर्मचारी मृत्युमुखी पडले तर दोन कर्मचारी वाचले. ही घटना आज (शनिवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली.

विठ्ठल शामलिंग शेरेकर (वय ४५, हनुमाननगर, सांगली) व उमाकांत प्रभाकर देशपांडे (५०, गणेशनगर, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमी झालेल्या संजय सदाशिव कोथमिरे (३०, कोगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर), संजय सदाशिव माळी २४, कवलापूर, ता. मिरज) यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महापालिकेच्या मलनि:स्सारण केंद्रामध्ये चार कर्मचारी काम करत होते. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन ते मलनि:स्सारण चेंबरमध्ये पडले. चार कर्मचा-यांपैकी दोन कर्मचा-यांना वाचवण्यात यश आले. तर दोन कर्मचा-यांचा गुदमरुन मृत्यू झाला.