Sanjay Leela Bhansali | ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर भन्साळींची ‘हीरामंडी’ वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ अभिनेत्रीने वेधले सगळ्यांचे लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आता गंगुबाई काठीयावाडीनंतर नवीन वेब सिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. ‘हीरामंडी’ असे या वेब सिरीजचे नाव असून लवकरच ही वेबसिरीज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तरी या वेब सिरीजचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. या वेब सिरीजच्या फर्स्ट लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या वेब सिरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहगल यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. (Sanjay Leela Bhansali)

नेटफ्लिक्सच्या अधिकृत ट्विटर पेजवरून या वेब सिरीजचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. हीरामंडीच्या फर्स्ट लूकची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सर्व अभिनेत्री रॉयल अवतारात दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांचे नाव आणि त्यानंतर या अभिनेत्री पिवळ्या रंगाच्या रॉयल आऊटफिट मध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. लवकरच ही वेब सिरीज नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटले की “संजय लीला भन्साळी यांची आणखीन एक जादुई दुनिया घेऊन येत आहोत.हा एक वेगळाच जग आणि एक वेगळाच काळ त्याचा भाग होण्यासाठी आपण वाट पाहत आहात…. हीरामंडीच्या या सुंदर आणि रंजक जगातील एक झलक तुमच्यासाठी”.

या व्हिडिओ मधून अंदाज येऊ शकतो की ही वेब सिरीज त्या काळातील दाखवली आहे जेव्हा वेश्या या
राण्यांप्रमाणे आयुष्य जगत होत्या. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) हे पहिल्यांदाच
वेब सिरीज दिग्दर्शित करत असल्यामुळे प्रेक्षकही आतुरतेने या वेब सिरीजची वाट पाहत आहेत.
मात्र अद्याप तरी या वेबसिरीच्या प्रदर्शनाची कोणतीही तारीख समोर आलेली नाही.
गंगुबाई काठीयावाडी नंतर आता हीरामंडीतून संजय लीला भन्साळी हे देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची कथा
प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Web Title :- Sanjay Leela Bhansali | heeramandi first look release sanjay leela bhansali upcoming web series releasing on netflix

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rakhi Sawant | गरोदर असल्याच्या चर्चांवर राखी सावंतने सोडले मौन ; आदिल खानवर केले गंभीर आरोप

Onkar Bhojane – Vanita Kharat | ओंकार आणि वनिताच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल; वनिताच्या नवऱ्याने या भेटीनंतर दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन