Sanjay Raut | संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांची न्यायालयाबाहेर भेट; खडसेंनी सांगितला भेटीचा किस्सा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोरेगाव कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patrachal Land Scam) अटकेत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज न्यायालयात सुनावणी होती. यावेळी योगायोगाने राष्ट्रवादीचे आमदार(NCP MLA) एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट झाली. या भेटीचा किस्सा एकनाथ खडसेंनी सांगितला आहे.

राऊत (Sanjay Raut) आणि खडसे यांची न्यायालयासमोर भेट झाली. यावेळी एकनाथ खडसेंनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. राऊत मला म्हणाले, मी लवकरच बाहेर येणार आहे. सर्व काही ओके आहे. तुम्ही कोणतीच चिंता करु नका, असे एकनाथ खडसेंनी सांगितले.

संजय राऊत यांनी गोरेगाव कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणांत जामिनासाठी अर्ज (Bail Application) केला आहे. त्यांच्या अर्जावर आणि नियमित सुनावणीवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राऊतांच्या जामीन अर्जाची सुनावणी पुढे ढकलली आहे. पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.

संजय राऊत यांचे धाकले बंधू प्रवीण राऊत (Pravin Raut) यांची गुरु आशिष कंन्स्ट्रक्शन
(Guru Ashish Construction) नामक एक बांधकाम कंपनी आहे.
गोरेगाव पत्राचाळीतील रहिवाश्यांनी या कंपनीला पुर्नविकासाचे काम दिले होते.
ह्यात प्रवीण राऊत यांनी मोठ्या प्रमाणात पैश्यांचा अपहार केला आणि ते पैसे त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावर टाकले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
तसेच त्यातील 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या खात्यावर देखील आले होते.
त्यामुळे संजय राऊत यांनी पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) कायद्यांतर्गत सक्तवसुली
संचलनालयाने अटक (Enforcement Directorate) केली आहे.

Web Title :- Sanjay Raut | mp sanjay raut and eknath khadse met in front of the court today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांची कुडाळमधून चौफेर फटकेबाजी; ‘त्या’ घटनेची आठवण करुन देत भाजपवर केला प्रश्नांचा भडीमार

MIM MP Imtiyaz Jaleel | संजय शिरसाटांना आला हृद्यविकाराचा झटका; इम्तियाज जलील यांनी सांगितले राजकारण

Pune Crime | ताडपत्री चोरण्याचा जाब विचारल्याच्या रागातून रॉडने मारहाण, कोंबडी पुलावरील घडना