MIM MP Imtiyaz Jaleel | संजय शिरसाटांना आला हृद्यविकाराचा झटका; इम्तियाज जलील यांनी सांगितले राजकारण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना हृद्यविकाराचा झटका (Heart Attack) आला आहे. त्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) यांनी भाष्य केले आहे. त्यांनी त्यांना हृद्यविकाराचा झटका येण्याचे राजकीय कारण सांगितले. संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना पालकमंत्र्याच्या खुर्चीत बघून त्यांचा रक्तदाब वाढला आणि संजय शिरसाट यांना हृद्यविकाराचा झटका आला, अशा शब्दात इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) यांनी चिमटा काढला.

 

संजय शिरसाट यांना आलेल्या हृद्यविकाराच्या झटक्यावर इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) यांनी चिमटा काढला आहे. शिवसेनेत बंडखोरी झाली, तेव्हा शिरसाट खूप आक्रमक होते. मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) सर्वांची अपेक्षा होती. शिरसाट यांना देखील मंत्रिपद हवे होते. मात्र, त्यांना त्यातून वगळण्यात आले. त्यानंतर संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांना औरंगाबादचा पालकमंत्री केले गेले. संदिपान भुमरे यांना पालकमंत्र्यांच्या खुर्चीत पाहिल्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढला असेल. पण शिरसाट यांची बातमी मिळाल्यानंतर मला खूप धक्का बसला, असे जलील म्हणाले.

 

संजय शिरसाट यांना सोमवारी (दि.17) दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तेथून त्यांना मंगळवारी मुंबईला रवाना करण्यात आले. संजय शिरसाट यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी फोन करुन त्यांची विचारपूस केली आहे.

 

Web Title :- MIM MP Imtiyaz Jaleel | imtiyaz jaleel taunt sanjay shirsat over sandipan bhumare after heart attack sanjay shirsat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना क्रेडिट जाऊ नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; संदीप देशपांडेंचा आरोप

Uddhav Thackeray | चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Pune Crime | ताडपत्री चोरण्याचा जाब विचारल्याच्या रागातून रॉडने मारहाण, कोंबडी पुलावरील घडना