Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘एकीकडे गुजरात उद्योग आणि कर्नाटक गावं पळवत असताना मुख्यमंत्री मात्र तंत्रमंत्रात अडकले’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिरात बुधवारी दर्शनाला गेले होते. त्यांनी शिर्डीला जात असताना पूर्वनियोजित दौऱ्यात बदल करून अचानक सिन्नरचा दौरा केला. तिथे त्यांनी कॅप्टन खरात नावाच्या व्यक्तीची भेट घेऊन भविष्य पहिले अशी चर्चा होत आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांनी असे भविष्य पाहणे गंभीर असल्याची टीका केली होती. आता मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांच्या यादीत शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांचेही नाव जोडले आहे. एकीकडे गुजरात उद्योग आणि कर्नाटक गावं पळवत असताना मुख्यमंत्री मात्र तंत्रमंत्रात अडकले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue)

 

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर (Maharashtra Karnatak Simavad) दावा सांगण्याचा विचार कर्नाटक गांभीर्याने करत आहे, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा सुरु झाला. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिन्नर मधील एका मंदिरात गेले होते. तिथे जाऊन त्यांनी कॅप्टन खरात नावाच्या व्यक्तीकडून भविष्य जाणून घेतले अशी चर्चा सुरु आहे. त्याला महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या उद्योगांचा संदर्भ घेत राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला केला. (Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue)

आक्रमक पवित्रा घेत संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात अत्यंत दुर्बल आणि कमजोर सरकार अस्तित्वात आलंय. एकीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला. तर दुसरीकडे गुजरात महाराष्ट्रातील उद्योग पळवत आहे. महाराष्ट्रामधील गावं हडप करण्याचा कर्नाटककडून प्रयत्न सुरु आहे. पण कानड्यांच्या जोरजुलूमाला आम्ही भीक घालणार नाही. हा इशारा समजा किंवा उघड धमकी.. पण आम्ही कानड्यांच्याविरोधात लढत राहू..”

 

“महाराष्ट्राचे सरकार कमजोर असेल, मिंधे असेल. पण आजही राज्यावर आलेले प्रत्येक संकट शिवसेना परतावून लावू शकते.
अगदीच जर रक्त सांडवण्याची वेळ आली तर, तेही करू. महाराष्ट्रासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलंय.
बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगला आहे, आम्हीही भोगू. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर याद राखा,
हा इशारा नाही धमकी देतोय. ” असेही संजय राऊत यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्र्यांबरोबर सिन्नर दौऱ्याला उपस्थित असलेले मंत्री दीपक केसरकर यांनी सिन्नर दौऱ्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, तिथे गोशाळेचे काम सुरु होणार असून मुख्यमंत्री ते पाहण्यासाठी तिथे गेले होते.

 

Web Title :- Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | sanjay raut slam cm eknath shinde over cm visit sinnar mirgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Pratap Sarnaik | शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानीच्या चरणी 75 तोळे सोने अर्पण

FIFA World Cup 2022 | पेलेनंतर स्पेनचा गॅवी ठरला विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?