FIFA World Cup 2022 | पेलेनंतर स्पेनचा गॅवी ठरला विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू

पोलीसनामा ऑनलाईन – FIFA World Cup 2022 | फिफा विश्वचषक 2022 मध्ये सध्या अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. यामध्ये सौदी अरेबिया संघाने बलाढ्य अर्जेंटिना संघाचा पराभव केला. तसेच स्पेनने कोस्टा रिकाचा 7-0 असा पराभव करून या स्पर्धेला धमाक्यात सुरुवात केली. फेरान टोरेसच्या दोन गोलमुळे स्पेनने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. स्पेनचा विश्वचषक इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी 24 जून 1998 रोजी स्पेनने बल्गेरियाचा 6-1 असा पराभव केला होता. या सामन्यानंतर स्पेन ग्रुप-ई मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. याच सामन्यात स्पेनचा मिडफिल्डर गॅवीच्या Gavi (footballer) नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. गॅवी हा ब्राझीलच्या महान फुटबॉलपटू पेलेनंतरचा सर्वात तरुण विश्वचषक गोलकर्ता बनला आहे. (FIFA World Cup 2022)

17 व्या वर्षी पेलेने स्वीडनमध्ये ब्राझीलला पहिले विश्वचषक जिंकून दिले होते. त्या विश्वचषकात त्याने एकूण सहा गोल केले होते. 18 वर्षीय गॅवीने विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा सर्वात तरुण स्पॅनिश खेळाडू बनल्यानंतर सामन्यातील सर्वात उत्कृष्ट खेळाडू असा पुरस्कारही मिळवला.
गॅवीने 2006 विश्वचषकातील युक्रेनविरुद्ध गोल करणाऱ्या 19 वर्षीय सेस्क फॅब्रेगासचा विक्रम मोडला.

“मी या कामगिरीबद्दल आनंदी आहे. मला माझ्या गोलपेक्षा सर्वात जास्त काळजी होती ती सामन्याची,
याचे कारण की आम्ही विश्वचषकातील पहिलाच सामना आणि त्यात परत मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या
स्पर्धेत खेळत आहे त्यामुळे काही चुका तर होणार नाहीत ना आम्ही सामना नाही जिंकलो तर पुढे कसे होईल हेच
सर्व विचार माझ्या डोक्यात सुरु होते. मात्र आमच्या संघाने अफलातून खेळ करत तब्बल 7 गोल करून सामना
खिशात घातला.” अशी भावना गॅवीने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.

Web Title :- FIFA World Cup 2022 | fifa world cup 2022 the spanish footballer gavi became the youngest player to score a goal in the world cup after pele

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Karnataka Border Issue | कर्नाटकमधील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना जाहीर आवाहन, म्हणाले – ‘सोलापूर, अक्कलकोटही…’

Bank Holiday In Maharashtra And Goa | डिसेंबरमध्ये 13 दिवस बँकांना सुट्टया, जाणून घ्या महाराष्ट्र आणि गोव्यात किती दिवस राहणार बँका बंद

Janhvi Kapoor | जान्हवीने धर्मा प्रोडक्शन आणि करण जोहर बद्दल केले ‘हे’ मोठे विधान