Sanjay Raut On rahul Narvekar | राऊतांची नार्वेकरांवर गंभीर टीका, विधानसभा अध्यक्षपदाचा नेहमीच आदर, पण ही व्यक्ती त्या लायक आहे का?

मुंबई : Sanjay Raut On rahul Narvekar | दिल्लीमधून आदेश येतात, तर ते दिल्लीलाच जाणार. संविधानानुसार निर्णय दिला असता तर हे सगळे आमदार घरी बसले असते. दिल्लीचे आदेश काय येतात, त्यावर हे सुनावणी घेणार. विधानसभा अध्यक्षांचा (Assembly Speaker) आम्ही नेहमी आदर केला आहे. पण ही व्यक्ती त्या लायक आहे का? ते स्वत: कायदा आणि संविधान मानतात का? अशी गंभीर टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Sanjay Raut On rahul Narvekar) यांच्यावर केली आहे.

सध्या शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत शिंदे गटाच्या (Shinde Group) वकिलांनी ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभुंना घेरले आहे. दरम्यान, सुनावणीत विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करत आहेत, शिंदे गटाला झुकते माप देत आहेत, अशी रितसर तक्रार प्रभु यांनी केली आहे. या सुनावणीवरूनच खासदार संजय राऊत यांनी वरील गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्या आमदारांवर कारवाई झाली पाहिजे हा कायदा आहे, परंतू त्यावर निर्णय घेतला जात नाही. (Sanjay Raut On rahul Narvekar)

शिंदे गटाचे राजकीय भाकित करताना राऊत पुढे म्हणाले की, अजित पवार आणि शिंदे गटातले बहुतांश आमदार आणि खासदार भाजपात (BJP) प्रवेश करतील. भाजपाने त्यांना उमेदवारी दिली तर कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील.
ज्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांना सोडले त्यातील अनेकांचे पराभव होणार आहेत.
राज्यातील जनतेची मी मानसिकता पाहत आहे, नागरिक गद्दारांना स्वीकारणार नाहीत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) राजस्थान दौऱ्यावर टीका करताना
संजय राऊत म्हणाले, पुढच्या वर्षी अमेरिका आणि फ्रान्समध्ये निवडणुका आहेत.
शिंदे हे ताकदवर नेते आहेत, तिकडे पण त्यांच्या सभा लागतील. तसेच येथे पालिका निवडणुका आधी घायला सांगा,
चालले राजस्थानमध्ये प्रचार करायला, अशी खिल्ली राऊत यांनी उडवली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पक्षपातीपणाचा आरोप करत सुनिल प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार; सुनावणीसाठी १६ दिवस शिल्लक