Sanjay Raut | ‘हिंमत असेल तर अंगावरची राजवस्त्रे काढून बाहेर या’, संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशाचे सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर आज पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रखर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणेंना चांगलचं खडसावलं आहे. नारायण राणेंनी एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊतांना (Sanjay Raut) मी सोडणार नाही. मी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे. असे वक्तव्य केले होते. त्यावर आज (दि. ६) रोजी संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणेंवर चांगलाच हल्लाबोल केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ तून संजय राऊतांनी (Sanjay Raut) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर भाष्य केले होते. त्यावर एका कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी मी संजय राऊतांना सोडणार नाही. तसेच मी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे. असे वक्तव्य केले होते त्यावर आज बोलताना संजय राऊतांनी राणेवर कठोर शब्दात टीका केली आहे.

आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाही. तसेच ईडीची नोटीस येताच आम्ही पक्ष बदलणारे नाही. त्यांनी धाडसाच्या गोष्टी बोलाव्यात का? मी अद्याप त्यांच्याबाबत काहीच बोललेलो नाही. ते आमचे सहकारी होते. त्यांनी धमक्या देऊ नये. धमक्या देत असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. हे मला तुरुंगात काय टाकणार. मी माझ्या पक्षासाठी हिमतीने तुरुंगात गेलो आहे,’ असे यावेळी बोलताना संजय राऊतांनी नारायण राणेंना सुनावले.

तसेच यावर पुढे बोलताना, ‘मी तुमच्यासारखा ईडीने बोलवल्यावर पळून गेलेलो नाही.
मी शरणागती पत्करलेली नाही. आम्ही नामर्द नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत.
तुम्ही कायद्याचे बाप झाले आहात का? कोण काय बोलतंय तसेच प्रत्येकाचे वक्तव्य आम्ही
सरन्यायाधीशांना पाठवत आहोत. नारायण राणे यांची आर्थिक प्रकरणे बाहेर काढली तर ते ५० वर्षे बाहेर येणार
नाहीत.’ असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणेंना दिला.

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut criticizes narayan rane for commenting on saamana editorial

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पोलीस शिपायाचा परस्पर कारनामा; लोहमार्ग उपअधीक्षकाच्या नावाने परस्पर मागितले सीसीटीव्ही फुटेज

Protein Powder Desi Tip | बाजारात कशाला जायचे जर घरातच बनवता येते प्रोटीन पावडर? जाणून घ्या सेवनाचा Right Time