Sanjay Raut | संजय राऊत इज बॅक, ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; अखेर जामीन अर्ज मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Goregaon Patra Chawl Scam) शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये प्रविण राऊत (Pravin Raut) आणि संजय राऊत (Sanjay Raut) या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर (Bail Application Granted) करण्यात आला आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) जून महिन्यात अटक (Arrest) केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) हलवण्यात आला. राऊत यांना पुन्हा एकदा पीएमएलए न्यायालयात (PMLA Court) हजर करण्यात आले होते. मागील सुनावणीमध्ये ईडीने लेखी उत्तर सादर केले होते.

आज कोर्टामध्ये मोठ्या संख्येने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
प्रचंड गर्दी  टाचणी पडली तरी आवाज येईल, एवढी शांतता होती. सर्वांचं लक्ष न्यायाधीश एम. जी. देशपांडे (Judge M.G. Deshpande) यांच्या निकालाकडे लागले होते. तब्बल दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर न्यायाधीश देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

Web Title :-  Sanjay Raut | sanjay raut granted bail in goregaon patrachawl case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | रिव्हर्स घेताना कार घातली अंगावर; डॉक्टर महिलेवर गुन्हा दाखल

Deepali Sayyad | ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार; केले गंभीर आरोप