Sanjay Raut | “त्याबाबतीत मी नारायण राणे, राज ठाकरेंना मानतो…”; संजय राऊतांचे कौतुकोद्गार

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन- ठाकरे गटातील (Uddhav Thackarey Group) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) जवळपास १०३ दिवसाच्या तुरुंगावासानंतर जामीनावर बाहेर आले आहेत. त्यांचे ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह (CM Eknath Shinde, Devendra Fadanvis) राज ठाकरेंवरही निशाणा साधला होता. पण आता त्यांनी राज ठाकरेंसह नारायण राणे (Narayan Rane) यांचे देखील कौतुक केले आहे.

“एकनाथ शिंदे गेले तेव्हा स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करू शकत होते, स्वतःला आजमावू शकत होते. त्याबाबतीत मी राज ठाकरेंना (Raj Thackarey) मानतो, नारायण राणेंचंही कौतुक केलंय. राणेंनी आमच्यावर टीका केली, पक्ष सोडून गेले. राणेंनी आपला पक्ष स्थापन केला पण त्यांना ते जमलं नाही, पण राणेंनी आपला पक्ष दुसऱ्या पक्षात विलिन केला. पण ही शिवसेना माझीच आणि ही शिवसेना मी संपवेन हा विचार चुकीचा आहे. हा विचार महाराष्ट्राला परवडणारा नाही, हा विचार मराठी माणसाचा घात करणारा आहे,” असे राऊत म्हणाले. ते एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Sanjay Raut)

“शिंदे गटाने (Eknath Shinde Faction) आता परत फिरलं पाहिजे, आता खूप झालं. महाराष्ट्र कमजोर होतोय.
महाराष्ट्र कमोजर केल्याबद्दल जनता भविष्यात या लोकांवर खटला चालवेल.
जनतेच्या न्यायालयात यांच्यावर खटले चालवले जातील. हा तळातळात, तळमळ आहे.
जी शिवसेना बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून उभी केली, त्याचे क्षणात तुमच्या स्वार्थासाठी दोन तुकडे केलेत.” असेही राऊत म्हणाले.

Web Title :-  Sanjay Raut | shiv sena mp sanjay raut praises mns chief raj thackeray bjp narayan rane not splitting shiv sena eknath shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | …म्हणून पुण्यातील ‘त्या’ वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची कंट्रोल रूममध्ये बदली; जाणून घ्या प्रकरण

Chandarashekhar Bawankule-Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळेंनी धरलं उध्दव ठाकरेंनाच जबाबदार, म्हणाले – ‘प्रकल्प त्यांच्यामुळेच…’

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर; जाणून घ्या कोर्टात काय-काय झालं