”संजय राऊतांना आता “दिग्दर्शकाची” नाही… तर “दिशादर्शकाची” गरज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘मी चित्रपट माननीय बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला बाकी कोणी कस वागायचं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा प्रश्न (आहे)’ असं मत पानसेंनी व्यक्त केला आहे.

ह्याच वक्तव्यांचे फोटोही सोशल मडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे आणि सिनेमेचे निर्माते संजय राऊत यांच्यात झालेल्या वादानंतर त्याचे पडसाद आता सोशल नेटवर्किंगवर उमटू लागले आहेत.

चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे तडकाफडकी उठून निघून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर या प्रकरणाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. मनसेच्या नेत्यांपासून ते सामान्यांपर्यंत अनेकांनी या प्रकरणामध्ये आपले मत नोंदवले आहे. त्यातही काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर अनेक मनसैनिंकांनी #ISupportAbhijeetPanse हा हॅशटॅग वापरून या प्रकरणामध्ये पानसेंची बाजू घेतली आहे.

नेमकं काय घडलं होत ?
२३ जानेवारी रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास ‘ठाकरे’ सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान मुंबईतील अ‍ॅट्रिया सिनेमागृहामध्ये पानसे आणि राऊत यांच्यादरम्यान घडलेले मान अपमान नाट्य कॅमेरांमध्ये कैद झाले. त्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी #ISupportAbhijeetPanse हा हॅशटॅग वापरून याप्रकरणामध्ये पानसेंना पाठिंबा दिला आहे. ‘ठाकरे’ सिनेमाचे श्रेय मनसेला मिळू नये म्हणून सेनेने जाणून बुजून हे केल्याच्या आरोपापासून ते राऊत यांना आता दिग्दर्शका ऐवजी दिशादर्शकाची गरज आहे असे अनेक ट्विटस या हॅशटॅगवर पहायला मिळत आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या सर्व प्रकरणानंतर अभिजित पानसे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे ट्विटवर सांगितले. त्यामध्ये अभिजित यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना, ‘मी चित्रपट माननीय बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला बाकी कोणी कस वागायचं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा प्रश्न (आहे)’ असं मत व्यक्त केल्याचंही देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहेत. पानसेंचे हेच वक्तव्यांचे फोटोही सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

https://twitter.com/YogeshJChile1

दरम्यान या वादानंतर संजय राऊत यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरला आहे. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.