Sanman Dhan Yojana | सहायक कामगार आयुक्त : सन्मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांना माहिती अद्ययावत करावी, 10 हजार रुपये मिळणार

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra State Govt) सन्मानधन योजनेचा (Sanman Dhan Yojana) लाभ घेण्यासाठी घरेलू कामगारांनी ३१ मे २०२३ पूर्वी कामगार उपायुक्त कार्यालयात समक्ष हजर राहून अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक कामगार आयुक्तांनी (Assistant Labour Commissioner) केले आहे.

शासनाकडून ५५ ते ६० वयोमर्यादा पूर्ण केलेल्या आणि घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये (Gharelu Kamgar Kalyan Mandal) ३१ डिसेंबर २०२२ अखेर नोंदीत कामगारांना कामगार सन्मानधन योजनेअंतर्गत (Gharelu Kamgar Yojana) १० हजार रुपये मिळणार आहेत. त्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालय (Deputy Commissioner of Labour), शक्ती चेंबर्स, सर्वे क्र. ७७/१, २ रा, 3 रा आणि ४ था मजला, संगमवाडी पुणे-४११००३ येथे हजार राहून अर्ज सादर करावा. (Sanman Dhan Yojana)

अर्जासोबत प्रपत्र अ, बँकेच्या पासबुकची सत्यप्रत, लाभार्थ्यांच्या ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या नोंदणीची
किंवा नूतनीकरणाच्या पावतीची सत्यप्रत आणि आधारकार्डची सत्यप्रत सादर करावी,
असेही कामगार उपायुक्त कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title :-   Sanman Dhan Yojana | Assistant Labour Commissioner: Domestic workers should update information to avail Sanman dhan Yojana, they will get Rs. 10,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Pune Mahavitaran News | महावितरणच्या उत्कृष्ट 56 जनमित्रांचा सहकुटुंबासह गौरव ! सेवेचा समृद्ध वारसा जोपासण्याचे ध्येय ठेवा – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

NCP Chief Sharad Pawar | मला विचार करायला 2-3 दिवस द्या, शरद पवारांनी पाठविला कार्यकर्त्यांना निरोप; 1 अटही…

Ajit Pawar On TDM Marathi Movie | हे दुर्देवी, टीडीएमला लवकरात लवकर… दिग्दर्शक भाऊरावांच्या मदतीसाठी खुद्द अजित पवार आले पुढे