NCP Chief Sharad Pawar | मला विचार करायला 2-3 दिवस द्या, शरद पवारांनी पाठविला कार्यकर्त्यांना निरोप; 1 अटही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. काही वेळाने शरद पवार सिल्व्हर ओक (Silver Oaks) या निवास्थानी गेले. त्यानंतर वाय.बी. चव्हाण सेंटर (YB Chavan Center) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले तर काही जण उपोषण करण्यास बसले. कार्यकर्ते उपोषणाला बसल्याचे शरद पवार यांना समजल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना निरोप पाठविला. (NCP Chief Sharad Pawar)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोषणाबाजी, आंदोलन, उपोषण करणार्‍या कार्यकर्त्यांना संबोधित केले. अजित पवार यांनी शरद पवार यांचा निरोप कार्यकर्त्यांना दिला. अजित पवार म्हणाले, आजच्या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते प्रेमापोटी आले होते. पवार साहेब असा काही निर्णय घेतली असं कोणालाही वाटलं नव्हतं.

विचार करायला दोन ते तीन दिवस द्या असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
माझ्यावर अवलंबून असतील तर माझं ऐकलंच पाहिजे असा निरोप त्यांनी दिला.
हट्टीपणा बरोबर नाही. प्रत्येकाने आपापल्या घरी जावे असे अजित पवार यांनी सांगितले.

Advt.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar will take two to three days to rethink his decision says ncp ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – 17 वर्षीय मुलीवर बलात्कार

Udayanraje Bhosale – Chowk Marathi Movie | महाराजांच्या हस्ते ‘चौक’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च ! श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली ‘चौक’च्या कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप!

Pune Cyber Crime News | टेलिग्राम ग्रुपवर ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक