Sant Janabai Girls Government Hostel Yerwada Pune | संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येरवडा पुणे येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे : Sant Janabai Girls Government Hostel Yerwada Pune | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह येरवडा पुणे येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी दिली आहे. (Sant Janabai Girls Government Hostel Yerwada Pune)

संत जनाबाई मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात १०० मागासवर्गीय मुलींना इत्ता अकरावी, बारावी व डिप्लोमा
पर्यंतच्या वर्गाना मोफत प्रवेश देण्यात येतो. त्याचबरोबर दरमहा ८०० रुपये निर्वाहभत्ता, १०० रुपये स्वच्छतेसाठी
दिले जातात. स्टेशनरीसाठी ४ हजार रुपये प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी दिले जातात. सहल, गणवेश, ॲप्रण व प्रोजेक्टसाठीही नियमानुसार साहित्य पुरविण्यात येते.

या वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थीनींनी तहसिलदारांचा मागील वर्षाचा उत्पनाचा दाखला,
मागील वर्षाचे गुणप्रत्रक, जातीचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.

इच्छुक विद्यार्थीनींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११) अथवा गृहपाल,
संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येरवडा पुणे (भ्रमणध्वनी क्रमांक ९५६१५६८४५९) येथे
संपर्क साधावा, असे आवाहन संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

Web Title :- Sant Janabai Girls Government Hostel Yerwada Pune | Sant Janabai Backward Class Girls Hostel Yerwada Pune admission process started

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Pune PMC News | बोपोडी- सांगवी दरम्यानच्या मुळा नदीवरील पुलाचा निम्मा खर्च पुणे महापालिका करणार; पिंपरी चिंचवड महापालिकेला कामाचे 18.13 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

KDMC Property Tax | कल्याण-डोंबिवली मनपात समाविष्ट २७ गावांतील मालमत्ता कर, बांधकामांबाबत धोरण निश्चित करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp | राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा