Sant Rohidas Leather Industries And Char Makar Development Corporation | संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडील विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे : Sant Rohidas Leather Industries And Char Makar Development Corporation | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार, गोची, ढोर व होलार ) व्यक्तींसाठी सन २०२३-२४ मध्ये विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. (Sant Rohidas Leather Industries And Char Makar Development Corporation)

अनुदान योजना आणि बीजभांडवल योजनेसाठी अटी व शर्तीनुसार महामंडळाच्या कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. विशेष घटक व बीज भांडवल योजनेतंर्गतचे यापुर्वीचे जुने कर्जप्रस्ताव रद्द करण्यात येतील. स्वहस्ताक्षरात, टंकलिखीत अथवा महामंडळाच्या विहीत नमुन्यातील झेरॉक्स प्रतीत अर्ज स्विकारण्यात येतील. (Sant Rohidas Leather Industries And Char Makar Development Corporation)

महामंडळ राबवित असलेल्या कुठल्याही शासकीय योजनेचा पती अथवा पत्नी यांनी लाभ घेतलेला असल्यास किंवा अर्जदार हा कुठलाही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, अन्यथा कर्जप्रस्ताव अपात्र करण्यात येईल. अर्जदार यांनी परिपूर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात व्यक्तीशः अर्ज दाखल करणे अनिवार्य असून कर्जप्रस्ताव मध्यस्थामार्फत स्विकारले जाणार नाही.

अर्जदारांकडून सर्व परिपूर्ण कागदपत्र असलेलेच कर्ज प्रस्ताव स्विकारले जातील. अर्जदाराने अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांवर अर्जदाराची स्वाक्षरी असावी. अर्जदाराने दाखल केलेली कागदपत्रे खोटी आढळून आल्यास त्यास जबाबदार धरून त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मध्यस्थ हे जर कामामध्ये हस्तक्षेप करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन शासकीय कामात अडथळा या सदराखाली संबंधित मध्यस्थावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

कर्जप्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेऊन नंतरच कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी बँकेस / महामंडळाच्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात येतील. प्राप्त कर्जप्रस्ताव बँकेस पाठवितांना एका उद्दिष्टास दोन पट या पद्धतीने कर्जप्रस्ताव जेष्ठतेनुसार बँकेकडे शिफारस करण्यात येतील.

कर्ज प्रस्तावासोबत जातीचा दाखला, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्डची छायांकित प्रत, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, कोटेशन (जीएसटी सह), आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनाकरिता परवाना अथवा बॅच बिल्ला, जागेचा पुरावा लाईटबिल अथवा टॅक्सपावती, व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. (NSFDC) योजनेअंतर्गत जुन्या प्रलंबित कर्जप्रस्तावाबाबत ज्या लाभार्थ्यांनी
यापुर्वी जिल्हा कार्यालयात कर्जप्रस्ताव दाखल केलेले आहेत आणि ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व
जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत, अशा लाभार्थीची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डावर लावलेली असून संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करून कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत.

लाभार्थ्यांचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्याचा विनंती अर्ज, ज्या जागी व्यवसाय चालू करावयाचा आहे त्या
त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला सोबत जोडावा.
दोन सक्षम जामीनदारापैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा केला नाही
तर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र आवश्यक आहे.
लाभार्थ्याचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या
कर्मचाऱ्याची सेवा ५ ते ६ वर्ष बाकी आहे असा जामीनदार घेणे आवश्यक आहे.

जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळपाहणी अहवाल व शिफारस,लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअर,
अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र, यापूर्वी कर्जाच्या अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे,
रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र, जातीचा दाखला, लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक,
आधार संलग्न (लिंक) बँक खाते क्रमांक, जी.एस.टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक,
अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र इत्यादी कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत.

महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली असून आहे.
चर्मकार समाजातील बांधवांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ दाखल करुन जास्तीत जास्त अर्जदारांनी
शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे
जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Web Title :-  Sant Rohidas Leather Industries And Char Makar Development Corporation | Appeal to take advantage of various schemes of Sant Rohidas Leather Industries And Char Makar Development Corporation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Wildlife Management In Maharashtra | व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मुल्यांकनात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पांत

Pune District Development Plan | जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सर्वंकष माहिती द्यावी – नियोजन उपायुक्त संजय कोलगणे