#VideoViral : सपनाने गोव्यात दाखवली डान्सची जादू , ठुमक्यांनी चाहत्यांना केले घायाळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध हरियाणवी डान्स आणि सिंगर सपना चौधरीचा डान्स आणि तिचे गाणे नेहमीच व्हायरल होत असतात आणि सोशलवर धुमाकूळ घालत असतात. स्टेज कार्यक्रमांसाठी सपना चौधरी देशभरात प्रसिद्ध आहे. सर्वात आधी ती हरियाणामध्येच आपल्या डान्सचा जलवा दाखवत होती.

परंतु आता मात्र ती युपी राजस्थान, मध्य प्रदेश, बिहारमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखवताना दिसत आहे. सपना चौधरी फक्त हरियाणवीच नाही तर, बॉलिवूड, भोजपुरी आणि पंजाबी गाण्यांवरही डान्स करते. काही काळापूर्वीच ती गोव्यातही आपल्या डान्सचा जलवा दाखवून आली आहे. तिच्या गोव्यातील कार्यक्रमाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

सध्या सपनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. सपना चौधरीची अदा पाहून तिचे चाहते नेहमीच घायाळ होताना दिसत असतात. सध्याचा समोर आलेला व्हिडीओ हा गोव्यातील कसीनो रॉयलचा आहे. सपनासाठी पूर्ण स्टेज सजवण्यात आलं होतं. हिरव्या रंगाच्या सुटमध्ये सपना डान्स करताना दिसून आली. ती डान्स करताना उपस्थितांनी तिची शुटींग काढण्यास सुरुवात केली. सपनाचा डान्सचा हा व्हिडीओ तब्बल 10 मिनिटांचा आहे. परंतु तरीही ती अजिबात थकल्याचे दिसत नाही.

https://youtu.be/l4am3yeEjGQ

तुम्हाला सांगू इच्छितो की, सपना चौधरी 2018 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. सपना चौधरीने मागील वर्षी बिग बॉस सीजन 11 मध्येही सहभाग दाखवला होता. तिने शोमध्येही तिच्या डान्सचा जलवा दाखवला होता. या शोमधून बाहेर पडल्यानंतर सपनाचं आयुष्यंच बदलून गेलं. बाहेर आल्या आल्याच तिच्याकडे कामाच्या अनेक ऑफर्स आल्या. यावर्षीच तिने दोस्ती के साईड इफेक्ट या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे.