#VideoViral : …म्हणून डान्सर सपना चौधरीने फायरिंग करणार्‍याच्या कानशिलात लगावली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणवी डान्सर सपना चौधरी सध्या चर्चेत असल्याचे दिसत आहे. सपना आपल्या डान्समुळे खूपच फेमस झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशलवर तिच्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. प्रत्येक दिवशी तिचे व्हिडीओ युट्युबलाही ट्रेंडिंगला असतात. परंतु आता सपना डान्स व्हिडीओ नाही तर, रागाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत दिसत आहे की, सपना गोळी मारणाऱ्या एका मुलाच्या थोबाडीत मारताना दिसत आहे. तुम्ही वाचून चकित झाला असाल परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की, हा सपना चौधरीच्या एका गाण्यातील सीन आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की, हा व्हिडीओ सपनाच्या गाण्याचाच व्हिडीओ आहे. परंतु त्यात डान्स करताना दिसत नाही. या व्हिडीओत दिसत आहे की, एक मुलगा गोळी चालवत आहे. सपना धावत त्याच्याकडे येते आणि त्याच्या थोबाडीत मारते. गोळी मारणारा मुलगा शेळीच्या पिल्लाला गोळी मारण्याचा प्रयत्न करतो.

परंतु सपना त्या पिल्लाला वाचवते. सध्या सपनाचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत गावाकडच्या मुलीची भूमिका साकारणारी सपना खूपच सुंदर दिसत आहे. सपनाचा डान्स नसला तरी तिचा हा व्हिडीओ प्रेक्षकांना खूपच भावला आहे. तिच्या अभिनयाचीही अनेकांनी स्तुती केली आहे.

तसं पाहिलं तर सपनाचं हे गाणं खूपच जुनं आहे. परंतु हे गाणं पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे हे गाणं पुन्हा ट्रेंड करताना दिसत आहे. काला डोरा असे या गाण्याचे बोल आहेत. एका युट्युब चॅनलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला जवळपास एक कोटी लोकांनी पाहिले आहे. 87 लाखांहून अधिक व्ह्युज या व्हिडीओने घेतले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी

छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नका ; गंभीर आजाराचा संकेत

You might also like