‘भाई के साथ ऐसा पोज कौन देता है दीदी’ ? सारा अली खानचे बिकिनी फोटो पाहून युजर्स बावचळले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सारा अली खान गेल्या काही दिसवांपूर्वी बिकीनी लुकमध्ये दिसली होती. तिच्या या लुकची प्रचंड चर्चा झाली होती. साराचे बिकीनी फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले होते. पुन्हा एकदा सारानं आपला बोल्ड अवतार दाखवत काही बिकीनी फोटो शेअर केले आहेत. परंतु यावेळी तिनं भाऊ इब्राहिम अली खानसोबतचे बिकीनी फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळं तिच्यावर लोकांनी टीका केली आहे.

सारानं अलीकडेच तिच्या इंस्टावरून बिकीनीतले काही फोटो शेअर केले आहेत. यात एक फोटो असा आहे ज्यात सारानं भाऊ इब्राहिमच्या खांद्यावर हात ठेवून एक पोज दिली आहे. या फोटोतही तिनं बिकीनीच घातली आहे. परंतु चाहत्यांना साराचा हा फोटो खटकला आहे. त्यांनी फोटोवरून तिला चांगलंच सुनावलं आहे. सध्या साराच्या या फोटोची खूप चर्चा सुरू आहे.

https://www.instagram.com/p/B9WaQEYAc-K/

खरं तर बिकीनी फोटो शेअर करत तिनं भाऊ इब्राहिम अली खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु आपल्या बिकीनी अवतारामुळं आणि तिनं दिलेल्या पोजमुळं ती टीकेची धनी झाली आहे.

एकानं साराच्या फोटोवर कमेंट करत म्हटलं की, भावासोबत अशी पोज कोण देतं दीदी. एकानं म्हटलं की, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तुला हाच फोटो मिळाला आहे. याशिवाय इतरही अनेक चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.