भाऊ इब्राहिम आणि कार्तिक आर्यनने ‘अशाप्रकारे’ उडविली सारा अली खानची ‘खिल्ली’ व्हिडिओ…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानने काही दिवसांपुर्वी ट्रॅनिशनल अवतारामध्ये रॅम्प वॉक करुन आपल्या जलवा दाखविला होता. फॅशन शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांना सारा अली खानचा रॉयल अंदाज खूप पसंतीस पडला होता. हा फॅशन शो एका कारणामुळे चर्चेमध्ये आला. याचे कारण म्हणजे सारा अली खानला सपोर्ट करण्यासाठी आलेले कार्तिक आर्यन आणि तीचा भाऊ इब्राहिम.

अभिनेता कार्तिक आर्यन आणि साराचा भाऊ इब्राहिम खानने साराला सपोर्ट केला होता आणि तिला पाहून दोघे हसताना दिसून आले होते. साराची खास गोष्ट ही आहे की, ती एअरपोर्टपासून ते मीडियापर्यंत सगळ्यांना भेटल्यावर सारा हात जोडून नमस्कार करायला कधीच विसरत नाही. नुकत्याच रॅम्प वॉकच्या दरम्यान साराने हाथ जोडून सगळ्यांना नमस्कार केला. तिला पाहून इब्राहिम आणि कार्तिक आर्यनने सुद्धा तसेच केले.

https://www.instagram.com/p/B0b45x8nTld/

साराने आपला रॅम्प वॉक खूप छानप्रकारे पुर्ण केला. सोशल मीडियावर साराच्या या अंदाजाची खिल्ली उडवून कार्तिक आर्यन आणि इब्राहिम खानने एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला हा व्हिडिओ खूप तेजीने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, सारा रॅम्प वॉक पुर्ण करताना कार्तिक आणि इब्राहिम हात जोडून तिला हसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.


आरोग्यविषयक वृत्त