Sara Ali Khan | सारा अली खानला ‘ही’ मस्ती भोवली होती; शाळेतून सस्पेंट करण्याची आली होती वेळ

पोलीसनामा ऑमलाइन – आपल्या चित्रपटातील अभिनयाने व दिलखुलास व्यक्तीमत्त्वाने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमी चर्चे असते. सैफ अली खानची मुलगी असलेल्या साराने आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर बी टाऊनमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमी चाहत्यांसोबत व सर्वत्रच कूल अंदाज मध्ये दिसून येते. लहानपणी देखील सारा खूप नटखट असून शाळेमध्ये मस्ती करणारी होती. पण तिची शाळेतील एक मस्ती तिला खूप महाग पडली होती. अगदी तिला शाळेतून सस्पेंट करण्याची वेळ आली होती.

 

 

 

 

 

अभिनेत्री सारा अली खान हि तिच्या दिलखेचक अदांनी व खट्याळ स्वभावामुळे अनेकांना भावते. साराचा मोठा चाहता वर्ग असून आपल्या फॅन्सला सारा सगळ्या गोष्टी शेअर करत असते. (Bollywood News) तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या शाळेतील किस्सा सर्वांना ऐकवला होता. साराने सांगितले की ती शाळेमध्ये अगदीच मस्तीखोर विद्यार्थिनी होती. साराने सांगितले की शाळेमध्ये तिने केलेला एक प्रॅन्क तिच्या चांगलाच अंगलट आला होता. यामुळे साराला शाळेतून सस्पेंट करण्यात येणार होते.

 

 

साराने पुढे सांगितले की, मी सगळ्यांसोबत एक प्रॅन्क करायचे ठरवले. वर्गातील एका पंख्यावर मी सगळीकडे ग्लू पसरवून ठेवला होता. तो असा मुद्दाम पसरवला की पंखा चालू केला की तो सगळ्यांचा अंगावर पडेल. वर्गात जसा पंखा सुरु झाला सगळ्यांच्या अंगावर ग्लू पडला. ” मात्र अशी मस्ती करणे साराला महाग पडले. हे प्रकरण अगदी प्रिंसिपलपर्यंत गेले. प्रिंसिपल सारा अली खानवर खूप रागावल्या. पण सस्पेंट न करता दिला शेवटची ताकिद देऊन सोडून दिले. अभिनेत्री सारा अली खानने तिचे अनेक वैयक्तिक किस्से या मुलाखतीमध्ये शेअर केले.

 

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) व अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh)
यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिने 2018 साली ‘केदारनाथ’ चित्रपटातून
(Kedarnath Movie) बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने सिंबा (Simba),
लव आज कल (Love Aaj Kal) यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सारा नुकतीच विकी कौशल (Vicky Kaushal) सोबत ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटामध्ये झळकली होती. त्याचबरोबर सारा तिच्या भगवान शंकाराच्या भक्तीमुळेही चर्चेत असते.

 

Web Title : Sara Ali Khan | sara ali khan was about to be suspended due to a prank in school

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा