Pune ACB News | तत्कालीन उपायुक्त तथा पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य नितीन ढगेंसह त्यांच्या पत्नीविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल

 1 कोटी 28 लाख 95 हजार 150 रूपयाची अपसंपदा बाळगल्याचे प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB News | तत्कालीन उपायुक्त तथा पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य नितीन चंद्रकांत ढगे Nitin Chandrakant Dhage (41) आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा नितीन ढगे Pratibha Nitin Dhage (35, दोघे रा. सर्व्हे नं. 71, सीएसटी नं. 1436, रहेजा गार्डन्स, लव्हेड ए फ्लॅट नं. 501, वानवडी, पुणे) यांच्याविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनने 1 कोटी 28 लाख 95 हजार 150 रूपयांची अपसंपदा बाळल्याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune ACB News)

 

पोलिस उप अधीक्षक माधुरी भोसले (DySP Madhuri Bhosale) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन ढगे यांच्याविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनने सन 2021 मध्ये सापळा (Pune ACB Trap Case) कारवाई केली होती. त्यामध्ये वानवडी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरूध्द दि. 16 ऑक्टोबर 2021 रोजी गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ढगे यांच्या घरझडतीमध्ये तब्बल 1 कोटी 28 लाख 49 हजार रूपये मिळुन आले होते. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी अ‍ॅन्टी करप्शनकडून (ACB Open Inquiry) चालु करण्यात आली आहे. उघड चौकशीअंती नितीन ढगे यांनी 1 कोटी 28 लाख 95 हजार 150 (ज्ञात उत्पन्नापेक्षा 47 टक्के जास्त) रूपये इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने (Corruption) मिळवल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune ACB News)

 

नितीन ढगे यांनी त्यांची पत्नी प्रतिभा नितीन ढगे यांनी अपप्रेरणा दिल्याने तसेच खोटी माहिती
कागदपत्रामध्ये भरून वापरून शासनाची फसवणुक (Cheating With Govt) केली आहे.
म्हणुन नितीन ढगे आणि प्रतिभा ढगे यांच्याविरूध्द वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Dr. Sheetal Janve-Kharade)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सुदाम पाचोरकर (DySP Sudam Pachorkar) हे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune ACB News | Anti-corruption case registered against the Ex Deputy Commissioner and Pune
District Caste Certificate Verification Committee member Nitin Dhage along with his wife

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा