Sara Tendulkar | सारा सचिन तेंडुलकरचं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरनं (Sara Tendulkar) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती एका क्लोदिंग ब्रँडची जाहिरात करताना दिसत असून तिच्याबरोबर बॉलिवूडचा अभिनेता सुनिल शेट्टी याचा मुलगा अहान (sunil shetty son ahan) याची गर्लफ्रेन्ड आणि OTT प्लॅटफॉर्म अँमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला चित्रपट सरदार उधम (sardar udham) मधील रेश्माची भूमीका साकारणारी अभिनेत्री बनिता संधू (banita sandhu), तानिया श्रॉफही (tania shroff) सोबत दिसत आहे. साराचा हा व्हिडीओ अवघ्या काही वेळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर संबंधित क्लोदिंग कंपनीनंही सारा तेंडुलकरला लाँच करत तिचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सारा तेंडुलकर हिने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावर सारा (Sara Tendulkar) खूप अँक्टिव्ह असते. अनेकदा अनेकदा इन्स्टा स्टोरिज, व्हिडीओ  आणि फोटोही ती शेअर करताना दिसते. यावेळी तिनं जाहिरातीचा एक व्हिडीओ (Sara Tendulkar Instagram Account) शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी तिचे बॉलिवूडची गायिका कनिका कपूर हिच्यासोबतचे डेट नाईट फोटोही व्हायरल झाले होते. एक ब्रिटीश आणि भारतीय अभिनेत्री असलेली बनिता संधू हिने इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटांमध्ये भूमीका साकारल्या आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ऑक्टोबर’ या चित्रपटातून वरुण धवनसोबत तिने डेब्यू केला होता. याशिवाय अमेरिकन टीव्ही सीरिज पँडोरामध्येही ती झळकली होती.

 

Web Title :  sachin tendulkar daughter sara tendulkar ajio modeling debut ad shoot ahan shetty girlfriend banita sandhu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ‘या’ सरकारी योजनेत दरमहिना जमा करा 210 रुपये; पती-पत्नी दोघांना मिळेल 10,000 रू. पेन्शन, समजून घ्या गणित

OBC Reservation Maharashtra | ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका ! OBC आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे

Devendra Fadnavis | ‘काही संकुचित वृत्ती देशाला ‘त्या’ मार्गावरून खाली उतरविण्याचा प्रयत्न करतात’ (व्हिडिओ)

Shashi Tharoor | शिवसेनेच्या खा. प्रियंका चतुर्वेदींनंतर काँग्रेस खासदार शशी थरुर यांचाही राजीनामा; सोडला TV शो