Sarkari Naukri Exam | सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आता या १५ भाषांमध्ये होणार परीक्षा, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : सरकारी नोकरी (Sarkari Naukri) साठी तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता उमेदवार त्यांच्या स्थानिक भाषेत केंद्र सरकारची कोणतीही परीक्षा (Govt Job Exam) देऊ शकतात. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी म्हटले की, सरकारी नोकर भरती परीक्षा (Sarkari Naukri Recruitment Exam) १५ भाषांमध्ये घेण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे जेणेकरून कोणत्याही युवकाची संधी सुटू नये. एका कार्यक्रमात संबोधित करताना ते म्हणाले, या ऐतिहासिक निर्णयामुळे स्थानिक तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन मिळेल आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन मिळेल.

१५ भारतीय भाषांमध्ये होईल सरकारी नोकरीची परीक्षा केंद्रीय राज्यमंत्री सिंह म्हणाले, अलीकडेच १५ भारतीय भाषांमध्ये सरकारी नोकरीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जेणेकरून देशातील कोणताही तरुण भाषेच्या अडथळ्यामुळे नोकरीची संधी गमावणार नाही.

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे Staff Selection Commission (एसएससी – SSC) आयोजित भरती परीक्षेचा संदर्भ देताना ते म्हणाले, हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, पेपर १३ प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजे आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, उडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी (मैती देखील) आणि कोकणीमध्ये सेट केला जाईल.

मंत्री म्हणाले, गेल्या नऊ वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली,
अधिकृत भाषा हिंदी व्यतिरिक्त भारतीय प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्षणीय प्रगती झाली आहे.
या निर्णयामुळे लाखो उमेदवार त्यांची मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षेला बसतील आणि त्यांच्या निवडीची शक्यता वाढेल.
सिंग म्हणाले की, इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा घेण्याची
मागणी विविध राज्यांमधून सातत्याने होत होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

21 August Rashifal : वृषभ, मकर आणि कुंभ राशीवाल्यांना भासू शकते पैशाची चणचण, जाणून घ्या दैनिक राशीभविष्य

Gram & Raisins | हरभरे आणि हे ड्रायफ्रूट खा, आरोग्याचे होतील 5 मोठे फायदे, हाडे होतील मजबूत, जाणून घ्या पद्धत