रांजणगाव एमआयडीसी कंपनीतील अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या सरपंचावर FIR

पुणे (रांजणगाव) : पोलीसनामा ऑनलाईन – रांजणगाव एमआयडीसी कंपनीतील अधिकाऱ्यांना धमकावून लेबर कॉन्ट्रॅक्ट मागणाऱ्या सरपंचाविरुद्ध रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सरपंचासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार एमआयडीसीमधील अ‍ॅक्वा प्रा. ली. कंपनीत गुरुवारी (दि.११) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. पोलिसांनी सरपंच राजेंद्र तुकाराम दसगुडे (वय-३१ रा. कर्डीलवाडी, ता. शिरुर), रविंद्र रुपचंद फरगडे (वय-३०), गणेश बाळु ढेरंगे (वय-२८), राहुल भास्कर सोनावळे (वय-२५), सचिन जयवंत दसगुडे (वय-३६), आदीनाथ विष्णु निचीत (वय-२९) यांच्यावर रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अ‍ॅक्वा कंपनीचे अधिकारी राहुल आनंद नार्लेकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच राजेंद्र दसगुडे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी अ‍ॅक्वा कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी कंपनीचे अधिकारी राहुल नार्लेकर यांना दमदाटी केली. आरोपींनी राहुल नार्लेकर यांना शिवीगाळ करून हात पाय तोडण्याची धमकी दिली. रांजणगाव पोलीस ठाण्यात राहुल यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम आणि पोलीस हवालदार अमीरुद्दीन चमनशेख करीत आहेत.

Loading...
You might also like