Satara BJP | लाच घेणे पडले महागात, भाजपच्या वाई नगराध्यक्षांवर राज्य सरकारची मोठी कारवाई

सातारा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  सातारा जिल्ह्यात भाजपला (Satara BJP) मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई येथील भाजप (Satara BJP) नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे (Mayor Dr. Pratibha Shinde) यांच्यावर राज्य शासनाने अपात्रतेची कारवाई केली आहे. डॉ. शिंदे आणि त्यांच्या पतीला 2017 मध्ये ठेकेदाराकडून (contractor) लाच (Bribe) घेताना अटक (Arrest) झाली होती. त्यानंतर वेळोवेळी याबाबत सुनावणी झाली अखेर त्यांना उर्वरित कालावधीसाठी नगराध्यपदावरून दूर करण्याचा निर्णय नगरविकास विभागाच्या (Urban Development Department) राज्यमंत्र्यांनी घेतला आहे.

नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी भाजपकडून थेट नगराध्यपदासाठी निवडणूक लढवली होती.
त्या निवडून आल्यानंतर वाईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गटाला मोठा धक्का बसला होता.
मात्र आता त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या वाईत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आज नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अपात्रतेचे आदेश काढले.

डॉ. शिंदे यांनी एका कामाच्या मोबदल्यात ठेकेदाराकडे 14 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. त्यांच्या अटकेनंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात (District Sessions Court) जामीन घेतला होता. दरम्यानच्या काळात पालिकेतील 16 नगरसेवकांनी त्यांना पदावरुन बाजूला करा,
अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती.
त्याची सुनावणी 20 ऑगस्ट 2020 आणि 30 सप्टेंबर 2020 रोजी झाली होती.
त्यानंतर सरकारने डॉ. शिंदे यांना नगराध्यक्षपदावरुन हटविण्याचा निर्णय दिला.
याशिवाय त्यांना पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही.
असेही राज्य सरकारने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

 

Web Title : satara bjp | big jolt to bjp in satara district state government removes wai mayor pratibha shinde in bribe case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IAF Recruitment 2021 | ‘या’ उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय हवाई दलात होणार भरती

BSNL | बीएसएनएलचा धमाका प्लॅन ! 120 दिवसांसाठी 240 GB Data सहित आणखी काही मिळणार सुविधा

Modi Government | भारतातून चोरीला गेलेला 75 % वारसा मोदी सरकारच्या 7 वर्षात परत आला – जी किशन रेड्डी