Pune Lok Sabha Election 2024 | पुण्यातील भाजपा उमेदवार मोहोळ यांचा पूर्व प्रमाणीरकण न करता सोशल मीडियावर प्रचार, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

पुणे : Pune Lok Sabha Election 2024 | सध्या लोकसभा निवडणूक २०२४ साठी आदर्श अचारसंहित लागू असून उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना सोशल मीडियावर प्रचार करताना आयोगाने घातलेल्या अटी शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, सोशल मीडियावर पूर्वप्रमाणीरकण न करता सुशल्क जाहीरात केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी सात जणांना कारणे दाखवा नोटीस बाजवली आहे. तसेच तात्काळ खुलासा करावा, असे बजावले आहे. त्यामध्ये मोहोळ यांचा प्रचार करणाऱ्या भाजपच्या एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार, राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक सोशल मीडियावर सशुल्क जाहिराती करत आहेत. परंतु, सशुल्क जाहिरात करण्यापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीमार्फत (एमसीएमसी) जाहिरातींचे पूर्वप्रमाणीरकण करुन घेणे आवश्यक आहे. (Pune Lok Sabha Election 2024)

हे पूर्वप्रमाणीकरण न करणाऱ्या सात जणांना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ही नोटीस बाजवली आहे. यामध्ये पुणे लोकसभेचे भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सोशल मीडियावर प्रचार करणारे भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांना देखील जिल्हा प्रशासनाने नोटीस पाठविली आहे.

बालवडकर यांनी फेसबुक पेजवरून आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचा प्रचार केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाने बालवडकर यांना नोटीस बजावली.
याबाबत प्रतिक्रिया देताना बालवडकर यांनी म्हटले आहे की आचारसंहितेचे सर्व नियम पाळून फेसबुक पोस्ट केली होती.
मात्र तरी देखील नोटीस आली. या नोटिसीला कायदेशीर उत्तर देऊ.

दरम्यान, काही राजकीय पक्षाचे उमेदवार, त्यांचे समर्थक, पक्षाचे पदाधिकारी आपल्या उमेदवाराचा प्रचार
सोशल मीडिया हाताळणाऱ्या कंपनीला पैसे देऊन करत आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने असे करता येत नाही.

असे ठेवले जातेय सोशल मीडियावरील प्रचारावर लक्ष…

  • सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ६ जणांची टीम तयार केली आहे.
  • या टीममध्ये तीन जण सायबर पोलीस, एक सोशल मिडिया तज्ज्ञ आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
  • हे तज्ज्ञ सोशल मीडियावर सशुल्क केल्या जाणाऱ्या जाहिरातींचे अवलोकन करतात.
    त्या जाहिराती एखादा उमेदवार किंवा पक्षाला फायदा व्हावा, यासाठी केल्या असतील,
    असे निदर्शनास झाल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित