नवी दिल्ली : Fruits for Blood Circulation | शरीरात रक्त आवश्यक प्रमाणात असावे लागते, ते सर्वत्र वाहणे आवश्यक असते. रक्तप्रवाह कमी झाल्यास किंवा थांबल्यास अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्या फळांच्या सेवनाने रक्त प्रवाह वाढतो.(Fruits for Blood Circulation)
१. डाळिंब
एक डाळिंब शंभर आजारांवर उपाय आहे. डाळिंब हे खूप शक्तिशाली फळ आहे, ज्याच्या सेवनाने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, डाळिंबातील पॉलिफिनॉल अँटीऑक्सिडंट वासोडिलेटरचे काम करते. त्यामुळे रक्ताभिसरण खूप जलद होते.
२. बीट –
बीट रक्त वाढवते आणि रक्ताभिसरण गतिमान करते. बीटमध्ये भरपूर नायट्रेट असते जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते. नायट्रिक ऑक्साईड मोठ्या प्रमाणात रक्ताभिसरण वाढवते.
३. सायट्रस फ्रूट –
सायट्रस फ्रूट म्हणजे लिंबू, संत्री, द्राक्ष इत्यादी आंबट-गोड फळे. सायट्रस फ्रूटमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स इत्यादी कंपाउंड असतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि रक्तवाहिन्यांना आराम मिळतो, ज्यामुळे रक्त प्रवाह आणि नायट्रिक ऑक्साईड वाढते.
४. बेरीज
स्ट्राबेरी, ब्लूबेरी, चेरी, ब्लॅकबेरी इत्यादी बेरी कुटुंबातील फळे आहेत.
बेरीमध्ये अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे ब्लड फ्लो वाढवतात.
एका संशोधनानुसार, बेरी फळ ब्लड प्रेशर, हार्ट रेट, प्लेटलेट्स आणि ब्लड लेव्हलमधील इम्फ्लामेटरी मार्कर इंटरल्यूकिन्स -६ कमी करते.
यामुळे या गोष्टींना सूज येत नाही. म्हणजे रक्त खराब होत नाही. अशा प्रकारे ते अप्रत्यक्षपणे रक्त प्रवाह वाढवते.
५. कलिंगड
कलिंगड हे उन्हाळी फळ असले तरी आता ते वर्षभर मिळते. कलिंगड रक्तप्रवाहाला गती देण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
कलिंगडमध्ये पुरेशा प्रमाणात आयर्न आणि व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
त्यामुळे रक्ताभिसरण खूप जलद होते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा