दुर्देवी ! भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा येथील वाई पोलिस उपविभागीय कार्यालयात कर्तव्य बजावत असेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. संग्राम शिर्के (वय २६, रा. किडगाव ता. सातारा) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा अपघात (दि.२५) रात्री १०.३० च्या दरम्यान रायगाव (ता. जावली) गावचे हद्दीतील पुणे, सातारा महामार्गावर घडली.

प्राथमिक माहितीनुसार, पुणे, सातारा महामार्गावरील रायगाव फाटा येथे अज्ञात वाहनाने संग्राम शिर्के यांना धडक दिल्याने हा अपघात झाला. तर गंभीर जखमी अवस्थेत पोलिस संग्राम शिर्के यांना उपचारासाठी साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवार (दि.२६) रात्री त्यांचा मृत्यू झाला. संग्राम शिर्के यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबियांना धोका बसला.

दरम्यान, याप्रकरणी पोलिस संग्राम यांच्या वडिलांनी भुईंज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.