अखेर ‘त्या’ महाविद्यालयाने सत्यनारायणाची पूजा घातली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुण्यातील काही महाविद्यालयामध्ये सत्यनारायणाची पूजा घालण्याचे फॅड सुरू झाले आहे की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही दिवसांपुर्वी फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायण पूजेचे प्रकरण निवळले असताना आता गरवारे महाविद्यालयाने बुधवारी सत्यनारायण पूजेचे आयोजन केल्याची माहिती समोर आली आहे. सत्यनारायण पूजेला विरोध करणार्‍या विद्यार्थी संघटनांकडून यावर काय भूमिका घेतली जाते हे महत्वाचे ठरणार आहे.

उलट प्रवास करणाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक

काही दिवसांपुर्वी गरवारे महाविद्यालयाकडून सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने ती रद्द केली होती. आज (बुधवारी) गरवारे महाविद्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित केलेल्या पूजेवरून सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महाविद्यालयांना देवालय बनवण्यात आल्याचे सांगत अनेक विद्यार्थी संघटनांनी याला कडाडून विरोध दर्शविला होता. त्यानंतर काही दिवसानंतर गरवारे महाविद्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पण, फर्ग्युसन महाविद्यालयातील पूजेला झालेला विरोध पाहून गरवारे महाविद्यालयाच्या प्रशासनाने ती पूजा रद्द केल्याचे जाहीर देखील केले होते. संपुर्ण वाद मिटल्यानंतर आता आज (बुधवारी) गरवारे महाविद्यालयात सत्यनारायणाची पूजा आयोजित केल्याचे समोर आल्याने नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
पुण्यातील गरवारे कॉलेजमधील सत्यनारायणाच्या पूजेला स्थगिती

[amazon_link asins=’B07C2ZW7ZB,B07D77V1DX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a95a2c31-b0dd-11e8-9096-1deca89124b2′]