‘ती’ राजकन्या प्रथमच अमेरिकेत राजदूत

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सौदी अरेबियाने पहिल्यांदाच द्विपक्षीय संबंधामधील सर्वांत मोठा विश्वासू असलेल्या यु.एस .ए मध्ये राजदूत म्हणून राजकन्येची निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदा या पदावर एका महिलेची निवड करण्यात आली आहे. रिमा बिन बनदर बिन सुलतान या यु.एस.ए मध्ये सौदीच्या राजदूत असतील. रिमा बिन बनदार बिन सुलतान या सौदी राजघराण्यातील आहेत.

इस्तंबुलमध्ये एका वरिष्ठ पत्रकार जमाल खशोगी यांची सौदीकडून कुर हत्या झाली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध टोकाला गेले आहेत. रिमा यांची खालीद बिन सलमान यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे . खालीद यांची २०१७ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. खालीद सौदी राजे सलमान यांचे चिरंजीव आणि क्राऊन प्रिन्स महमंद बिन सलमान यांचे लहान भाऊ आहेत. त्यांची आता सौदीच्या उपसंरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रिेमा प्रिन्स बनदर बिन हे सुलताना यांच्या कन्या आहेत. १९८३ ते २००५ वर्षांत काळात प्रिन्स बनदर अमेरिकेत सौदाचे राजदूत होते. त्यांचे बुश कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध होते. रिमा यांचे वडील राजदूत असल्याने त्यांना अनेक वर्ष वाॅशिंग्टन या ठिकाणी राहिला मिळाले. म्युझियम या विषयांतून जाॅर्ज वाॅशिंग्टन विद्यापीठातून पदवी घेतली आहे. त्यांनी सौदीच्या क्रीडा आयेागात काम केलं आहे.