फेसबुक आणि Twitter सारख्या वेबसाइटपासून असा वाचवा तुमचा पर्सनल डेटा ? ‘या’ 6 पद्धती तुम्हाला ठेवतील सेफ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा ऑनलाइन प्रायव्हसीचा विषय येतो, तेव्हा बहुतांश लोक सहजतेने घेऊ लागतात, परंतु हे आवश्यक आहे की आपले प्रायव्हसी आणि ऑनलाइन शेयर केलेल्या पर्सनल डेटावर नियंत्रण असावे. यामध्ये सोशल मीडिया वेबसाइट आणि अ‍ॅपचा समावेश आहे, ज्याचा वापर रोज अनेक भारतीय करतात. फेसबुक आणि गुगलसारख्या प्लॅटफार्मने आपले अ‍ॅड नेटवर्क असे तयार केले आहे की ते तुमच्या पर्सनल डेटावर लक्ष ठेवतात. मात्र, अशा काही पद्धती आहेत ज्याद्वारे काही गोष्टींचा कंट्रोल तुम्ही परत घेऊ शकता. या पद्धती कोणत्या ते जाणून घेवूयात…

अ‍ॅड अशी करा मॅनेज
तुम्ही विविध सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर टार्गेट अ‍ॅड दाखवणार्‍या डेटा अ‍ॅडव्हटायजरवर प्रतिबंध लावू शकता. आपल्या प्रायव्हसी आणि अ‍ॅड सेटिंगच्याद्वारे यावर नजर ठेवा आणि सोशल मीडियावर ट्रॅकिंग आणि अ‍ॅड टार्गेटला प्रतिबंध करू शकता. जसे की ट्विटरवर Off-Twitter Activity आणि फेसबुकवर Ads Shown off of Facebook चा वापर केला जाऊ शकतो.

लोकेशन ट्रॅकिंग बंद करा
तुमच्या फोटोमध्ये लोकेशन ट्रॅकिंग आणि हिस्ट्री, इथपर्यंत की, मेटाडेटा सुद्धा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अ‍ॅप्सला अचूक लोकेशन्सला ट्रॅक आणि कॅटलॉग करण्याची परवानगी देतो. अशावेळी एक चांगले प्रायव्हसी-सुरक्षा पाऊल म्हणून सर्व सोशल मीडिया अ‍ॅप्स आणि कॅमेरा फोनवर आपली लोकेशन सर्व्हिस बंद करा. जर तुमच्याकडे आयफोन आहे, तर तुम्ही याची सेटिंग्ज-प्रायव्हसी-लोकेशन सर्व्हिसमध्ये पाहू शकता. अँड्रॉइडवर, सेटिंग्स- लोकेशन शेयरिंग- लोकेशन हिस्ट्री बंद करा आणि अ‍ॅप्ससाठी अ‍ॅक्सेसला अ‍ॅडजेस्ट करा.

कुठेही लॉग इन करू नका
ट्विटर आणि टिकटॉकसारख्या काही सोशल मीडिया प्लेटफार्मवर, तुम्हाला कंटेंट पाहण्यासाठी लॉग इन करण्याची आवश्यकता नाही. लॉग इन केल्याने हे प्लॅटफॉर्म तुमचा खुप जास्त डेटा स्टोर करतात, जसे की यूजरची जर्नी, सर्च केलेला कंटेट आणि तुमच्याद्वारे क्लिक करण्यात येणार्‍या अ‍ॅडसह अनेक गोष्टींचा समावेश आहे.

अ‍ॅप आणि गेमच्या परमिशन रद्द करा
जर तुम्ही जास्त लोकांना पसंत करत असाल तर शक्यता आहे की, तुम्ही तुमच्या फेसबुक किंवा गुगल लॉग इन डिटेल्ससोबत दुसरे अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाइटमध्ये एंटर केले असेल. हे त्या साइटला तुमच्या डेटापर्यंत पोहचण्याची परवानगी प्रदान करते आणि फेसबुक तुमच्याबाबत जास्त माहिती देते. आपल्या फेसबुक सेटिंग्सद्वारे तुम्ही परमिशन्स रद्द करू शकता किंवा तुम्ही निवडू शकता की, तुमच्या द्वारे अजूनही वापरण्यात येणार अ‍ॅप्स आणि गेम्सचा कोणता डेटा घेतला जात आहे.

अ‍ॅडवर क्लिक करू नका
अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अ‍ॅप त्या अ‍ॅडवर नजर ठेवतात ज्यांच्यावर तुम्ही क्लिक करता, आणि हे सुद्धा पाहतात की, तुम्ही त्या बघण्यासाठी किंवा त्यांच्या माध्यमातून स्वाईप करण्यासाठी किती वेळ लावता. जर तुम्हाला तुमची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा अ‍ॅप्सला कळू द्यायची नसेल तर प्रत्यक्ष सर्वांकडे दुर्लक्ष करा. उदाहरणार्थ, तुम्ही इन्स्टाग्राम आणि गुगलवर मिळू शकणार्‍या शॉप सर्व्हिसचा वापर करू नका. जर तुम्हाला एखादी अशी गोष्ट दिसत असेल जी तुम्हाला आवडते, तर तुम्ही तुमच्या ब्राऊजरच्या माध्यमातून व्हीपीएनचा वापर करून शोधू शकता.

बर्नर ईमेल अ‍ॅड्रेस बनवा
बर्नर ईमेल म्हणजे वेगळा ईमेल आयडी. तुम्ही एक पर्सनल ईमेल अ‍ॅड्रेसशिवाय एक वेगळा आयडी सुद्धा बनवू शकता, ज्याचा वापर कॉमन कामांसाठी करता येईल. यामुळे कंपन्या तुम्हाला ट्रॅक करू शकणार नाहीत. येथे हे लक्षात ठेवा की, हा ईमेल आयडी तुमच्या पर्सनल ईमेलशी लिंक करू नका.