SBI ने पुन्हा ग्राहकांना दिला इशारा, सल्ला मानला नाही तर रिकामे होईल बँक अकाऊंट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना फसवणुकीबाबत पुन्हा एकदा सावध केले आहे. बँकेने ट्विट करत म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर बनावट किंवा फसवे मॅसेज पाठवत आहेत. हे मॅसेज दिसायला एसबीआयकडून असल्यासारखे वाटतात, परंतु ते बनावट आहेत, यापासून सावध राहा. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही, तर तुमचे खाते रिकामे होऊ शकते.
एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांना विनंती करत आहोत की, त्यांनी सोशल मीडियावर एसबीआयकडून आलेल्या फेक मॅसेजपासून सतर्क राहावे. सायबर गुन्हेगार नेहमी लोकांना फसवण्यासाठी लोकांना बँक किंवा टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरच्या नावाने लिंक पाठवतात.
येथे करा तक्रार
जर तुम्हाला एसबीआयच्या नावाने एखादा फेक ईमेल मिळाला तर तुम्ही तो नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर रिपोर्ट करा. बँकेनुसार इंटरनेट बँकिंगची अधिकृत साइट https://www.onlinesbi.sbi/ आहे. याशिवाय कोणत्याही अन्य साइटवर एसबीआय इंटरनेट बँकिंगसाठी व्हिजिट करू नये.
लक्षात ठेवा या सेफ्टी टिप्स
* कधीही कोणत्याही व्यक्तीला पर्सनल डिटेल सांगू नका.
* आपल्या खात्याचा पासवर्ड सतत बदलत राहा.
* कधीही फोन, ईमेल किंवा एसएमएसवर आपल्या इंटरनेट बँकिंग डिटेल कुणाला सांगू नका.
* कधीही संशयित लिंकवर क्लिक करू नका.
* कोणत्याही बँकेशी संबंधित माहितीसाठी नेहमी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर अवलंबून राहा.
* सायबर गुन्हेगारांसाठी स्थानिक पोलीस अधिकारी किंवा जवळच्या एसबीआय शाखेशी संपर्क साधा.