SBI Alert Message | सावधान ! ऑनलाईन व्यवहार करताय ? तर मग करू नका ‘ही’ चूक, अन्यथा..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात आता अनेक काम म्हटलं की ऑनलाईनच्या माध्यमातून केलं जात आहे. अनेक क्षेत्रात, खासगी (Private) आणि सरकारी कार्यालयीन कामकाज ऑनलाईनच्या माध्यमातून कार्य पार पाडले जाते. कोरोनाच्या महामारीत देखील ऑनलाईनद्वारे काम करण्यास अधिक वाढ दिसून आली. मात्र हे देखील खार आहे की, ऑनलाईनद्वारे फसवणूक केली जात आहे. हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI Alert Message) फसवणुकीपासून सावधगिरी राहण्याच्या सूचना SBI ग्राहकांना दिल्या आहेत. (State Bank of India has advised SBI customers to beware of fraud)

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच SBI ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी अन्यथा ग्राहकांचं अधिक नुकसान होणार असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. बँकेत ट्विटद्वारे माहित देत म्हटलं आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना (SBI Alert Message) आणि सल्ला देतो आहे. ग्राहकांनी कोणताही संवेदनशील data ऑनलाईन शेअर करू नका. आणि कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करुन कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करू नका.

हे शेअर करू नका..
जन्मतारीख,
डेबिट कार्ड नंबर,
इंटरनेट बँकिंग यूजर आयडी / पासवर्ड,
डेबिट कार्ड पिन, CVV,
OTP

SBI ने म्हटलं आहे, SBI, RBI, शासकीय कार्यालय, पोलीस, KYC प्राधिकरण अशा वेगवेगळ्या नावाने फसवणूक करणाऱ्यापासून सतर्क राहा.
SBI अथवा त्याचे कोणतेही प्रतिनिधी तुम्हाला कधीही ईमेल, SMS पाठवत नाही.
तसेच, ग्राहकांचीअसणारी वैयक्तिक माहिती, PASSWORD अथवा वन टाईम पासवर्डसाठी ते फोन करत नाहीत.
म्हणून तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
तर, Email, SMS आणि अन्य सोशल मीडियाद्वारे आलेल्या कोणत्याही ऑफरला प्रतिसाद देऊ नका.
तुम्हीच तुमची सुरक्षा करू शकता असं बँकेने म्हटलं आहे.
तसेच, बहुतांश ठिकाणी देशभर इंटरनेट वेगाने पसरत आहे.
याच कारणामुळे ऑनलाईन फसवणूक वाढली आहे.
विशेष म्हणजे याचा तपास करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने एक सायबर सेल तयार करण्यात आला आहे. असं एका वृत्तानुसार समोर आलं आहे.

या दरम्यान, आगामी काळामध्ये आर्थिक व्यवहार करताना अडचण येऊ नये यासाठी बँकेच्या सर्व ग्राहकांना 30 जूनपूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावे अशा सूचना देखील बँकेनं दिल्या आहेत. तसेच, SBDT अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स विभागाने पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढवली आहे. अशी माहिती SBI ने ट्विटद्वारे दिली आहे. पॅनकार्ड आधार कार्ड लिंक केलं नाही तर व्यवहारात अडथळा निर्माण होणार असल्याचं देखील बँकेनं सांगितलं आहे.

Web Title : sbi alert message to customers fraudsters and advise not share any sensitive details online

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक