SBI ची खास सुविधा ! आता काढू शकणार बँक अकाऊंटमधील बॅलन्सपेक्षा जास्त रक्कम, घ्या जाणून

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आता ग्राहकांना एक खास सुविधा देत आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यात असणाऱ्या रकमेपेक्षा अधिक रक्कम काढू शकाणार. बँकेच्या या सुविधेला ओवरड्राफ्ट फॅसिलिटी असे म्हटले जाते. आता तुमच्यासाठी देखील उपलब्ध आहे ही सुविधा.

काय आहे ही ओवरड्राफ्ट फॅसिलिटी?

ADV

ओवरड्राफ्ट हे एक प्रकारचे कर्ज आहे. यामुळे ग्राहक त्याच्या खात्यात असणाऱ्या रकमेपेक्षा अधिक रक्कम काढू काढू शकतो. आणि ही अधिक काढलेली रक्कम ठरवून दिलेल्या वेळेत परत करावी लागते आणि त्यावर व्याजही द्यावे लागते. व्याज डेली बेसिस वर आधारित मोजले जाते. ओवरड्राफ्ट फॅसिलिटी कोणतीही बँक किंवा नॉन-बँकिंग कंपनी देऊ शकते. तुम्हाला मिळणाऱ्या ओवरड्राफ्ट चा कालावधी काय असणार हे ती संबंधित बँक किंवा NBFCs ठरवते.

बँक आपल्या काही ग्राहकांना प्रिअप्रूव्हड फॅसिलिटी देते. तर काही ग्राहकांना वेगळी मंजुरी मिळवावी लागते. यासाठी लिखित किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अप्लाय करावे लागते. काही बँक यासाठी प्रोसेसिंग फीस देखील वसूल करतात. ओवरड्राफ्ट दोन पद्धतीचा असतो एक सिक्योर्ड आणि दुसरा अनसिक्योर्ड. सिक्योर्ड ओवरड्राफ्ट मध्ये सिक्योरिटी म्हणून काहीतरी गहाण ठेवावं लागतं.

तुम्ही एफडी, घर, शेअर्स, इंशोरन्स पॉलिसी, बॉण्ड्स यावर ओवरड्राफ्ट मिळवू शकता. याला सोप्या भाषेत एफडी किंवा कर्ज घेणे असेही म्हणता येईल. असं केल्यामुळे या गोष्टी बँक किंवा NBFCs कडे गहाण राहतील. जर तुमच्याकडे सिक्योरिटी साठी काहीही नसेल तरीसुध्दा तुम्ही कर्ज घेऊ शकता त्याला अनसिक्योर्ड ओवरड्राफ्ट असे म्हटले जाते.

मिळतो हा फायदा

जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा ते परत करण्यासाठी एक विशिष्ट कालावधी दिला जातो. जर तुम्ही हे कर्ज लवकर परत केलं तर तुम्हाला प्रिपेमेंट चार्ज द्यावा लागतो पण ओवरड्राफ्ट मध्ये तसं नाही. तुम्ही ठरलेल्या कालावधीच्या आधी देखील हे कर्ज परत करू शकता. त्याशिवाय EMI मध्ये परतफेडीचे बंधन नाही. या सर्व सुविधांमुळे हे कर्ज घेण्यापेक्षा अधिक स्वस्त आहे.

हे ध्यानात ठेवा

जर तुम्ही ओवरड्राफ्ट परत करू शकला नाही तर तुम्ही गहाण ठेवलेल्या वस्तुमधून त्याची भरपाई करून घेतली जाईल. पण जर ओवरड्राफ्ट गहाण ठेवलेल्या वस्तूंच्या किमतीपेक्षा अधिक असेल तर ते तुम्हाला परत करावं लागेल.