कोरोना महामारीत SBI चा उपक्रम, 30 कोटी रुपये खर्च करून बनवणार तात्पुरती रुग्णालये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मागील काही दिवसांपासून देश कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेशी सामना करत आहे. मागील 8 दिवसांपासून लागोपाठ तीन लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत. यादरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय सीएसआर उपक्रमांतर्गत देशातील सर्वात प्रभावी राज्यांत कोविड-19च्या रूग्णांच्या उपचारासाठी आयसीयू सुविधा असणारी तात्पूरती रूग्णालये तयार करणार आहे.

एसबीआयचे चेयरमन दिनेश कुमार खारा यांनी म्हटले की, बँकेने या कामासाठी अगोदरच 30 कोटी रुपयांची रक्कम ठेवली आहे आणि ते एनजीओ आणि हॉस्पिटल व्यवस्थापनांशी ही हॉस्पिटल उभी करण्यासाठी संपर्क करत आहेत. ही हॉस्पिटल कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आपत्कालीन आधारावर तयार केली जातील.

एकुण 1,000 बेडची सुविधा

त्यांनी सांगितले की, बँक कोविड-19 ने सर्वात जास्त प्रभावित राज्यांमध्ये 50 आयसीयू बेडची सुविधा असलेली एकुण 1,000 बेडची सुविधा असलेली हॉस्पिटल बनवणार आहे. अशा प्रकारे ही काही ठिकाणी 120 बेडची असतील. तर काही 150 बेडची असतील. हे ते बनवणार्‍या हॉस्पिटल्सच्या क्षमतेवर अवलंबून असेल.

स्टेट बँकेच्या अन्य उपक्रमांबाबत त्यांनी सांगितले की, स्टेट बँक रूग्णांसाठी ऑक्सीजन केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी हॉस्पिटल आणि अशासकीय संस्थांसोबत मिळून काम करत आहे. आम्ही एक योजना बनवली आहे. यासाठी आम्ही 70 कोटी रुपये ठेवले आहेत ज्यापैकी आम्ही कोविड-19 शी संबंधीत उपक्रम राबवण्यासाठी 17 सर्कलना 21 कोटी रुपये देत आहोत.

कर्मचार्‍यांसाठी सुविधा

बँक कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठी सुद्धा बँकेने पाऊल उचलले आहे. यासाठी देशभरात हॉस्पिटलशी टायअप केले आहे. जेणेकरून कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचाराची सुविधा मिळावी.