SBI FD Scheme | SBI च्या अमृत कलश FD स्कीमची मुदत पुन्हा वाढली: गुंतवणूकदार घेऊ शकतात 7 टक्के व्याजदराचा फायदा

पोलीसनामा ऑनलाइन – SBI FD Scheme | गुंतवणूक करण्यासाठी सध्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. पण यामधील लोकप्रिय असणारा एक प्रकार म्हणजे फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) आहे. गुंतवणूकीचा FD हा एक सुरक्षित पर्याय आहे. मागील काही वर्षात रिजर्व बॅंकेकडून (Reserve Bank of India) रेपो रेट (Repo rate) वाढवून लोकांवरील बोजा वाढवला होता मात्र याचा फायदा गुंतवणूकीदारांना झाला आणि त्य़ांना बॅंकेकडून FD वर जास्त व्याजदर मिळाले. फिक्स्ड डिपॉजिट असणारी SBI बॅंकेकडून देण्यात येणारी ‘अमृत कलश स्कीम’ (Amrit Kalash Scheme) ही लोकप्रिय स्कीम आहे. यामध्ये गुंतवणूकीवर 7 टक्क्यांपेक्षा आधी व्याजदर मिळते. ही स्कीम 15 ऑगस्ट रोजी संपणार होती. आता मात्र त्याची मुदतवाढ देण्यात आली असून ही (SBI FD Scheme) गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आहे.

देशातील मह्त्त्वपूर्ण असणारी स्टेट बैंक ऑफ इंडिया (State Bank of India) अर्थात SBI मध्ये अनेक खातेदार सुरक्षित गुंतवणूकीसाठी आपले पैसे ठेवतात. या बॅंकेतील ‘अमृत कलश स्कीम’ ही एक स्पेशल एफडी स्कीम आहे ज्याचा फायदा अनेकांनी घेतला आहे. 15 ऑगस्ट पर्यंत या स्कीमचा फायदा घेता येणार होता पण लोकांच्या प्रतिसादामुळे यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘अमृत कलश स्कीम’ ही स्पेशल FD असून यामध्ये 400 दिवसांची गुंतवणूक करावी लागते. आता यासाठी गुंतवणूकदार 31 डिसेंबर 2023 पर्यंत खाते उघडू शकतात. आणि त्याचा फायदा करुन घेऊ शकतात.

‘अमृत कलश स्कीम’ ही फिक्स्ड डिपॉजिट स्कीम गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे.
यामध्ये सामान्य लोकांना 7.1 टक्के व्याजदर (FD Scheme Interest Rate) मिळणार आहे तर जेष्ठ नागरिकांना
7.6 टक्के व्याजदर बॅंकेतर्फे दिला जाणार आहे. ही स्कीम 12 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती.
त्यावेळी 23 जून 2023 पर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये इन्व्हेस्टेंमट करता येणार होती.
पण लोकाग्रहास्तव याची पहिल्यांदा मुदतवाढ 15 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली.
आता दुसऱ्यांदा परत मुदतवाढ करण्यात आली असून आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत अमृत कलश स्कीममध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

SBI च्या या ठेव योजनेवरील मॅच्युरिटी व्याज TDS कापल्यानंतर ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाते.
आयकर कायद्यानुसार लागू होणाऱ्या दराने टीडीएस आकारला जाईल.
गुंतवणूकदार अमृत कलश एफडीमध्ये 2 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
या योजनेंतर्गत मुदतपूर्तीच्या तारखेपूर्वी पैसे येतात. बँकेच्या म्हणण्यानुसार, अमृत कलश एफडीमध्ये गुंतवणूक
करण्यासाठी वेगळ्या उत्पादन कोडची आवश्यकता नाही. यामध्ये तुम्ही योनो बँकिंग अॅपचा देखील वापर करु शकता.
अमृत कलश एफडी (SBI FD Scheme) योजनेंतर्गत खातेदार मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि पूर्ण वर्षाच्या
आधारावर त्यांचे व्याज घेऊ शकतात. TDS मधून कापलेले व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाते.
प्राप्तिकर (IT) नियमांनुसार कर कपात सूटची विनंती करण्यासाठी तुम्ही फॉर्म 15G/15H वापरू शकता.
या योजनेंतर्गत 19 वर्षे किंवा त्यावरील नागरिक त्यांचे खाते उघडू शकतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Jayant Patil | ‘महागाई, बेरोजगारीपेक्षा मी कोणत्या गटात जाणार याला महत्त्व’, पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं सडेतोड उत्तर (व्हिडीओ)

Devrishi Narad Patrkar Samman | ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर