SBI मध्ये गृहकर्ज मोफत ट्रान्सफर करायची शेवटची संधी

मुंबई : वृत्तसंस्था – देशाच्या सर्वात मोठ्या बँकेच्या ऑफर्सचा फायदा घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भारतीय स्टेट बँकने (SBI) गृहकर्ज टान्सफर करण्यासाठी विना शुल्क प्रक्रिया सुरु केली आहे. जर तुम्हाला कोणत्याही बँकेचे गृहकर्ज SBI बँकेत ट्रान्सफर करायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यायची नाही. याचा लाभ घेण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच २८ फेब्रुवारी २०१९ आहे. आपले कर्ज SBI बँकेत कसे ट्रान्सफर करण्याची प्रकिया जाणून घ्या.

कर्ज हस्तांतरण : ज्या गृहकर्ज कंपनी किंवा बँकेत तुम्ही कर्ज ट्रान्सफर करायचंय, त्या मूळ रक्कम बँक किंवा कंपनीला द्यावी लागते. गृहकर्ज ट्रान्सफर झालं की तुम्हाला ईएमआय नव्या बँकेत किंवा कंपनीत हस्तांतरित झाल्यावर नवी बँक किंवा कंपनीत जमा करायला हवं.

सुरू असलेलं कर्ज पहिल्यांदा बंद करा : सुरू असलेल्या कर्जासाठी कर्जदाता आणि कर्जदार, दोघांनाही पहिल्यांदा बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करायला हवी. नव्या बँकेत मूळ राशी जमा करून मूळ कागदपत्र मिळवावे लागतील.

नव्या कर्जाचं ॲग्रीमेंट : नवी आर्थिक संस्था आणि कर्जदार यांच्यात नवा कर्ज करार बनतो. त्यावर दोघंही सह्या करतात. त्यानंतर सर्व नियम, अटी यांचं पालन करणं गरजेचं होतं.

कर्ज कोण हस्तांतर करू शकतं? : जर तुम्ही कमीत कमी 12 महिन्यांत हप्ते भरताय आणि तुमचं क्रेडिट रेटिंग चांगलं आहे तर तुम्ही तुमच्या गृहकर्जाचा बॅलन्स ट्रान्सफर करू शकता. याशिवाय आर्थिक संस्थाही कमीत कमी किंवा जास्तीत जास्त रक्कम ठरवू शकते.

यासाठी काय करावं लागणार? : नव्या गृहकर्जाचा अर्ज नव्या आर्थिक संस्थेकडे द्यावा लागतो. काही कंपनी अर्ज ऑनलाइनही स्वीकारतात.

कुठली कागदपत्रं हवीत ? : यासाठी तुमचा फोटो, बँक खात्याचे डिटेल्स, ओळखपत्र आणि पत्त्याचं प्रूफ, पगाराचं प्रूफ इत्यादी कागदपत्र गरजेची आहेत. याशिवाय बँक किंवा कंपनीचं तुमची मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचं पत्र, किती कर्ज घेतलंय त्याचं कागदपत्र, मालमत्तेची कागदपत्र हवीत.

महत्त्वाच्या गोष्टी : बॅलन्स ट्रान्सफर करण्याआधी खर्चाचा हिशेब घ्या, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कुठलीही आर्थिक संस्था फ्लोटिंग व्याजावर कुठल्याही प्रकारचा फोरक्लोजर दर लावू शकत नाही.