खुशखबर ! सणासुदीपुर्वीच SBI चं ग्राहकांना ‘बंपर’ गिफ्ट ; ‘होम’, ‘पर्सनल’ आणि वाहन कर्जावरील व्याजदरात घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ( SBI) आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसबीआयने आज, सोमवारी सर्व कालावधीच्या कर्जांवरील मार्जिनल कॉस्ट ऑफ लेडिंग रेटमध्ये (MCLR ) कपात करणार असल्याचे जाहीर केले आहे. हा दर उद्या 10 सप्टेंबरपासून लागू होईल. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि अन्य प्रकारची कर्जे स्वस्त होणार असून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

तुमचा EMI किती कमी होईल-

स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली आहे. एमसीएलआरमध्ये घट झाल्यामुळे व्याजदर कमी होतो आणि त्यांना पहिल्यापेक्षा कमी ईएमआय भरावा लागतो. एसबीआयने कर्जाच्या दरात 10 बेसिस पॉईंट्सने (1 बेसिस पॉईंट्स म्हणजे 0.01 टक्के) कपात केली आहे. ईएमआय 0.10% पर्यंत दरमहा स्वस्त झाला आहे. बँकेने वर्षभरासाठीच्या कर्जावरील एमसीएलआर दर 8.25 टक्क्यांवरून 8.15 टक्क्यांवर आणला आहे.

या आर्थिक वर्षात एसबीआयकडून मार्जिनल कॉस्ट ऑफ लेडिंग रेटमध्ये केलेली ही सलग पाचवी कपात आहे. याआधी बँकेने 15 बेसिस पॉईंट्सने कर्जाचा दर कमी केला होता. हा दर 10 ऑगस्टपासून लागू केला होता.

MCLR कमी झाल्यामुळे कोणाला मिळणार थेट लाभ –

बँकांद्वारे एमसीएलआर वाढविला किंवा कमी केल्याचा थेट परिणाम नवीन कर्जदारांवर तसेच ज्यांनी एप्रिल 2016 नंतर कर्ज घेतले आहे त्यांच्यावर होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –