‘SBI’ मध्ये 477 पदांसाठी भरती, पगार 50 हजार रुपये, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI मध्ये नोकरी मिळवण्याची संधी बँकेने उपलब्ध करुन दिली आहे. एकूण 477 विशेषज्ञ केडर अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2019 असणार आहे.

पदाचे नाव –
विशेषज्ञ केडर अधिकारी (SCO)
रिक्त जागा – 477
वेतन – 23,700 ते 59,170 रुपये

महत्वाच्या तारखा –
1. ऑनलाइन अर्ज जमा करण्याची सुरुवात – 6 सप्टेंबर 2019
2. अंतिम तारीख – 25 सप्टेंबर 2019
3. ऑनलाइन परिक्षेची तारीख – 20 ऑक्टोबर 2019

परिक्षा शुल्क –
जनरल, ईडब्यूएस आणि ओबीसीसाठी – 750 रुपये
एसी, एसटी, PWD साठी – 125 रुपये
परिक्षा शुल्क भरण्याची पद्धत –
ऑनलाइन बँकिंगद्वारे उमेदवार परिक्षा शुल्क भरु शकतो.
उमेदवार https://www.sbi.co.in या वेबसाइटच्या माध्यमातून 6-9-2019 ते 25-9-2019 दरम्यान ऑनलाइन अर्ज करु शकतात.

निवड प्रक्रिया –
ही निवड ऑनलाइन टेस्ट आणि मुलाखत या आधारे करण्यात येईल.

 

Loading...
You might also like