SBI मध्ये 700 अपरेंटिसच्या जागांची भरती’, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाने अ‍ॅपरेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात नोकरी करु इच्छिणाऱ्यांना ही सुवर्ण संधी आहे. SBI ने विविध विभागात एकूण 700 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याचा अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2019 असणार आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2019
अर्ज करण्याची शेवटी तारीख – 6 ऑक्टोबर 2019
ऑनलाइन परिक्षेची संभाव्य तारीख – 23 ऑक्टोबर 2019
प्रवेशपत्र मिळण्याची संभाव्य तारीख – 15 ऑक्टोबर 2019 नंतर

पदांसंबंधित माहिती –

अ‍ॅपरेंटिस पदांसाठी एकूण संख्या – 700
हरियाणा – 150
पंजाब – 400
हिमाचल प्रदेश – 150

शैक्षणिक योग्यता –

कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेले अर्ज करु शकतात. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त असणे आवश्यक

वयोमर्यादा –
20 ते 28 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

निवड प्रक्रिया –
लेखी परिक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निवड

परिक्षेचा आराखडा –
जनरल/फाइनेंशियल अवेअरनेस, जनरल इंग्‍ल‍िश, क्‍वाँटिटेटिव एप्‍ट‍िट्यूड, रीजनिंग एबिलिटी आणि कंप्युटर एप्‍ट‍िट्यूडशी संबंधि‍त प्रश्न विचारण्यात येतील. प्रश्‍न हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असतील. या परिक्षेत निगेटिव मार्किंग देखील असणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like