SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! 452 पदांसाठी होणार भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) नोकरी मिळवण्याची मोठी संधी चालून आली आहे. बॅंकेने विविध पदाच्या 452 रिक्त जागांवर भरतीसाठी ऑनलाइन अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना sbi.co.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर 11 जानेवारी 2021पर्यंत अर्ज करता येणार आहे.

कोणत्या पदांवर भरती ?
बॅंकेच्या एकूण रिक्त जागांपैकी 16 जागा स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (इंजिनीअर – फायर) (SCO) या पदासाठी आहेत. डेप्युटी मॅनेजर (इंटर्नल ऑडिट) या पदासाठी 28, स्पेशालिस्ट ऑफिसर (नेटवर्क स्पेशालिस्ट) या पदासाठी 32, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (सिक्युरिटी ॲनालिस्ट) या पदासाठी 100, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर या पदासाठी 236, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (मॅनेजर – क्रेडिट प्रोसीजर्स) या पदासाठी 2, तर स्पेशालिस्ट क्रेडिट ऑफिसर (मार्केटिंग) या पदासाठी 38 जागा बँकेला भरायच्या आहेत.

काही पदांसाठीची भरती उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्यातून निवडलेल्या उमेदवारांच्या थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. अन्य पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन चाचणी घेतली जाणार असून ती फेब्रुवारी 2021मध्ये होण्याची शक्यता आहे. पात्र उमेदवारांनी 11 जानेवारी 2021 पर्यंत अर्जासोबत शुल्कही ऑनलाइन पद्धतीने जमा केल्यावरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अर्ज करण्याकरिता उमेदवारांना sbi.co.in या वेबसाइटच्या होमपेजवरच्या ‘करिअर्स’ या टॅबवर जावे लागेल. त्या पेजवर ‘लेटेस्ट अनाउन्समेंट’ या विभागात रिक्त पदांच्या भरतीची माहिती दिली असून तेथे ‘अप्लाय ऑनलाइन’ यावर क्लिक करावे लागणार आहे.

अर्ज केलेले उमेदवार पात्रतेच्या निकषात बसत असतील तरच आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्राचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच भरती अंतिम समजण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.